नगरमध्ये अडकलेले पाच हजारांवर स्थलांतरीत मूळगावी रवाना

नगर ः लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील विविध भागातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन तयार केले असून त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे. ३ मेपासून ते आतापर्यंत परराज्यातील ५ हजार २३४ स्थलांतरितांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आहे आहे. यात उत्तरप्रदेशमधील सर्वाधिक ३ हजार ९०३ स्थलांतरितांचा समावेश आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील विविध भागातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन तयार केले असून त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे. ३ मेपासून ते आतापर्यंत परराज्यातील ५ हजार २३४ स्थलांतरितांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आहे आहे. यात उत्तरप्रदेशमधील सर्वाधिक ३ हजार ९०३ स्थलांतरितांचा समावेश आहे.

‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि भाविकांना त्यांच्या मूळ राज्यात परतण्यासाठीची व्यवस्था करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका, नगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग अशा विविध यंत्रणा यासाठी राबत आहेत. यामध्ये राजस्थानमधील १३४, मध्य प्रदेशमधील ११६३, झारखंडमधील २५, आंध्र प्रदेशमधील ५ आणि तामिळनाडू येथील ४ स्थलांतरीतांना त्यांच्या गावी परत पाठविण्यात आले आहे.

संबंधित स्थलांतरीतांची माहिती जमा करणे, हे स्थलांतरीत कोणत्या राज्यातील आहेत, कोणत्या गावातील आहेत याची माहिती घेऊन त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यासाठी नियोजन तयार केले गेले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासाठी विशेष पथकाची स्थापना केली. प्रत्येक उपविभाग आणि तहसील पातळीवर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी त्यांची यंत्रणा गतिमान केली. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी कामगारांना रेल्वे स्टेशनपर्यंत आणताना विशेष खबरदारी घेतली.

स्थानिक गावपातळीवर तसेच औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना घेऊन येण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. काही सामाजिक संस्थांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्व प्रवाशांसोबत अन्न पाकीटे, पाण्याची बाटली आणि प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. नगर, पारनेर, राहुरी, जामखेड, कर्जत, शिर्डी, राहाता, कोपरगाव, संगमनेर तालुक्याच्या विविध भागात काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मूळगावी परत पाठविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com