Marathi Agri agricultural News Provision of five crores for Corona measures pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हा परिषदेची कोरोनाबाबत उपाययोजनांसाठी पाच कोटींची तरतूद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर यंत्रणा कार्यरत असून, एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग होऊन उपचाराची आवश्‍यकता भासल्यास, तसेच आरोग्य विषयक उपचाराच्या योजनांमध्ये समावेश नसलेल्या व स्वखर्चाने उपचार शक्य नसलेल्या रुग्णांसाठी जिल्हा परिषदेने पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे.

पुणे  : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य विषयक विम्याचा लाभ घेण्यास पात्र नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी या निधीचा वापर केला जाणार असल्याची माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारांसाठी निवडक खासगी रुग्णालयात व्यवस्था उभारली आहे. कोरोनाबाधित रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. ज्या रुग्णांनी आरोग्य विमा उतरविला आहे. त्यांचा विमा रकमेतून खर्च करणे अपेक्षित आहे. या तीन योजना वगळता इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधीतून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीला राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी दिली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कळविले आहे.
 

दिव्यांग व्यक्तींना सीएसआरमधून धान्य पुरवठा
‘कोरोना’च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये जिल्ह्यातील निराधार दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला अशा ५ हजार १६० लाभार्थ्यांना झोमॅटो कंपनीतर्फे सीएसआर निधीतून धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. कंपनीतर्फे दौंड तालुक्यात धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित तालुक्यांत धान्य वितरणाचे काम सुरू आहे.
 
उपकेंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण, जनजागृती, रुग्णांची तपासणी या कामांसाठी उपकेंद्रांकरिता १८८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. यामुळे फ्लू क्लिनिक, रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण, संशयित रुग्णांना उपचारासाठी पाठवणे, घरात किंवा रुग्णालयात क्वारंटाईन करणे, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेत्यांमार्फत संशयित रुग्ण शोधणे यासह कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...