Marathi Agri agricultural News registration start for community wedding ceremony Shirdi Maharashtra | Agrowon

शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची नोंदणी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या वतीन आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’मध्ये नोंद झालेली आहे. केवळ सव्वा रुपया शुल्क आकारून संपन्न होत असलेल्या या सोहळ्यातील वधू-वरांना संसारोपयोगी भांडी, नवा पोशाख व सोन्याचे मंगळसूत्र भेट दिले जाते. शहरातून थाटात मिरवणूक आणि वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते. 
— सुमित्राताई कोते, माजी नगराध्यक्षा, शिर्डी

शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने अठरा वर्षांची परंपरा असलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर (२६ एप्रिल) आयोजन करण्यात आले आहे. विविध जाती-धर्मातील १०१ जोडपी एकाच मंडपाच्या छताखाली केवळ सव्वा रुपये शुल्कात थाटात विवाहबद्ध होणार आहेत.

सोहळ्याचे संयोजक व माजी नगराध्यक्ष कैलास (बापू) कोते यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. या सोहळ्यात विवाहबद्ध होऊ इच्छिणाऱ्या वधू-वरांची नाव नोंदणी सुरू झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरातून आलेले वधू-वर व वऱ्हाडी मंडळींना ‘घरासमोर एक झाड लावा आणि शौचालयाचा वापर करा,’ असा सामाजिक संदेश यावेळी दिला जाणार आहे. 

श्री. कोते म्हणाले, की विवाह सोहळ्यांवरील वाढत्या खर्चामुळे ग्रामीण भागातील छोटे शेतकरी व शेतमजूर कर्जबाजारी होतात. त्याचा फटका त्या कुटुंबातील मुला मुलींच्या शिक्षणाला बसतो. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागे हे एक कारण असल्याचे निष्पन्न झाले, ही समस्या लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला. गेल्या अठरा वर्षात या उपक्रमाच्या माध्यमातून विवाहबद्ध झालेली विविध जाती-धर्माची अठराशेहून अधिक जोडपी सुखाने संसार करीत आहेत. या उपक्रमाच्या प्रसार आणि प्रचाराला हातभार लावीत आहेत. 

या सामुदायिक विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्षपद आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे भूषविणार आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जि. प.च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, नगराध्यक्ष अर्चना कोते, आमदार आशुतोष काळे यांच्यासह साधू-संत व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष सुमित्राताई कोते, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, पंकज लोढा, सामाजिक कार्यकर्ते भगीरथ होन, राजेंद्र चौधरी यांच्यासह विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नावनोंदणीसाठी येथे करा संपर्क ः संदीप डेरे : ९८५०५०००८०, अनिल शेळके : ९०९६१७४०५०, वाल्मीक बावचे : ९८२३१४१७७४, शफीक शेख : ९७६३२९८७१२


इतर ताज्या घडामोडी
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...