Marathi Agri agricultural News Saint Nivruttinath Maharaj's Paduka left for Pandharpur Maharashtra | Agrowon

संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायीवारी यावर्षी रद्द करण्यात आली. मात्र ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने मोजक्या २० जणांना संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुकांसह पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनासाठी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.३०) आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल दर्शनासाठी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांनी शिवशाही बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणारी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायीवारी यावर्षी रद्द करण्यात आली. मात्र ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने मोजक्या २० जणांना संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुकांसह पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनासाठी जाण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.३०) आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल दर्शनासाठी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांनी शिवशाही बसमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

मंगळवारी सकाळी प्रस्थानापूर्वी संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजर करीत संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चांदीच्या प्रतिमेसह पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमधील पवित्र कुशावर्त कुंडात पादुकांना स्नान घालण्यात आले तसेच विधिवत पूजा करण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेऊन संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. ‘कोरोना’मुळे पायी वारीने न जाता यावर्षी पादुका शिवशाही बसमधून पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.

या पादुकांसोबत पंढरपूरला जाण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे सदस्य, विणेकरी, ध्वजकरी, टाळकरी आणि व्यवस्थापकांसह २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, समाधी मंदिर विश्वस्त पुरुषोत्तम लोहगावकर, पप्पू शेलार, प्रशांत गायधनी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...