औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग, रोजगारनिर्मितीवर भर देणार ः उद्योगमंत्री सुभाष देसाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व उद्योगमंत्री म्हणून आपली जबाबदारी दुपटीने वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात शेती आधारित उद्योगांना प्रोत्साहन, तसेच रोजगारनिर्मितीसाठी माहिती तंत्रज्ञान उद्योगात गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करण्यावर विशेष भर राहील, असे उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. 

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यानंतर मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की २०१९-२० च्या आराखड्यानुसार मंजूर नियतव्यय २८८ कोटी होता. त्यानुसार २०२०-२१ साठी ३१० कोटींचा वाढीव नियतव्यय प्रस्तावित करण्यात येत आहे. अर्थमंत्री विविध जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन त्यांच्या वित्तविषयक मागण्यांसाठी तरतुदीविषयी चर्चा करताहेत. ३० तारखेला औरंगाबाद जिल्ह्याची बैठक असून, त्यामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्‍यक मागण्यांच्या अनुषंगाने आणखी वाढीव निधी मिळविण्यासाठी प्रयत्न राहील. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय यंत्र व औषधांनी सुसज्ज होण्यासाठी तातडीने पावले उचलले जातील. २६ जानेवारीला घाटी रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन पावले उचलले जातील. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडून मराठवाड्यात गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राविषयीच धोरण अधिक आकर्षक केले आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच मराठवाड्यात खासकरून औरंगाबाद परिसरात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी टाटाचे तन्मय चक्रवर्ती तसेच प्रकाश जैन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी ऑरीकमधील सुविधा पाहून समाधान व्यक्‍त करत गुंतवणुकीसाठी सहमती दर्शविली आहे.

बिडकीन जवळ ५०० एकरांत फूड पार्कची उभारणी करण्याचे आणि त्यामधील १०० एकर क्षेत्र केवळ महिला उद्योजकांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जूनपूर्वी या फूडपार्कचे भूमिपूजन होईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. या वेळी खासदार इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्‍त आस्तिककुमार पांडे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com