marathi agri agricultural news sugarcane transporters on strike kolhapur maharashtra | Agrowon

शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस वाहतूकदार बेमुदत संपावर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील श्रीदत्त, गुरुदत्त, शरद, जवाहरव व पंचगंगा या साखर कारखान्यांकडील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी ऊस वाहतुकीच्या दरात वाढ करावी, यासह अन्य मागण्यांकरिता सोमवारपासून (ता. ९) बेमुदत ऊसतोडणी वाहतूक बंद आंदोलनास सुरुवात केली आहे. मंगळवारीही (ता. १०) हे आंदोलन सुरूच होते. यामुळे दोन्ही तालुक्यांतील ऊस वाहतूक ठप्प झाली आहे.

कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील श्रीदत्त, गुरुदत्त, शरद, जवाहरव व पंचगंगा या साखर कारखान्यांकडील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी ऊस वाहतुकीच्या दरात वाढ करावी, यासह अन्य मागण्यांकरिता सोमवारपासून (ता. ९) बेमुदत ऊसतोडणी वाहतूक बंद आंदोलनास सुरुवात केली आहे. मंगळवारीही (ता. १०) हे आंदोलन सुरूच होते. यामुळे दोन्ही तालुक्यांतील ऊस वाहतूक ठप्प झाली आहे.

सध्याच्या ऊस वाहतूक दरात ४६ टक्‍के दरवाढ तसेच पाच टक्‍के कमिशन वाढ मिळावी, यासह आपल्या विविध मागण्यांकरिता शिरोळ व हातकंणगले तालुक्‍यातील पाच साखर कारखान्यांच्या वाहनधारकांनी सोमवारपासून बेमुदत ऊस वाहतूक बंद आंदोलनास सुरुवात केली आहे. यामुळे दोन दिवसांपासून ऊस कारखान्यांकडे येणे बंद झाल्याने या तालुक्यांमधील हंगाम ठप्प होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या पाच साखर कारखान्यांचे शेती अधिकारी व वाहनधारक संघटनांच्या प्रतिनिधींची दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर तोडगा काढण्याकरिता बैठक झाली. रायगोंडा डावरे, श्रीकांत गावडे, धनाजी पाटील, शिवाजी संकपाळ, माधवराव पाटील, संभाजीराव जाधव यांनी वाहनधारकांच्या व्यथा मांडल्या. तथापि बाजारात साखरेचे दर कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्‍कम देण्यात सध्या अडचणी असल्याचे कारखानदारांनी सांगितले. पण तोडगा निघू शकला नाही.


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...