Marathi Agri agricultural News tomorrow Budget meeting of Zilla Parishad Pune Maharashtra | Agrowon

 पुणे जिल्हा परिषदेची उद्या अंदाजपत्रकीय सभा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

पुणे   : जिल्हा परिषदेची तहकूब झालेली अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. १२) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. या सभेत २०२०-२१ चे अंदाजपत्रक अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे. या सभेत रस्ते, आरोग्य, पाणी टंचाई आराखडा या विषयांवर चर्चा होणार आहे. सभेची लिंक सर्व सदस्यांना पाठविण्यात आली असून त्यासंदर्भात सूचनाही मागविण्यात आल्या, असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे   : जिल्हा परिषदेची तहकूब झालेली अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. १२) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. या सभेत २०२०-२१ चे अंदाजपत्रक अवलोकनासाठी ठेवण्यात येणार आहे. या सभेत रस्ते, आरोग्य, पाणी टंचाई आराखडा या विषयांवर चर्चा होणार आहे. सभेची लिंक सर्व सदस्यांना पाठविण्यात आली असून त्यासंदर्भात सूचनाही मागविण्यात आल्या, असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात होणारी अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार अंदाजपत्रक मंजुरीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी २०१९-२० च्या सुधारित अंतिम अंदाजपत्रक तसेच २०२०-२१ च्या मुळ अंदाजपत्रकाला मान्यता दिली होती. या अंदाजपत्रकाला सदस्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत अवलोकन आवश्‍यक असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आता प्रशासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे ठरवले आहे. अनेक विषय महत्वाचे असल्याने ही तहकूब सभा लवकर करणे गरजेचे होते. वास्तविक पाहता ही सभा जुनपर्यंत घेता आली असती. मात्र, विषय मंजुरीला वेळ झाला असता. यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली असती. त्यामुळे ही सभा लवकर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय, उन्हाच्या झळा वाढताच पाण्याची टंचाई वाढू लागल्याने टंचाई निवारण उपायोजनांसाठी महत्वाचे निर्णय सभेत घेतले जाणार आहे. सदस्यांच्या सुचनांनुसार संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात येणार असून, सभेपूर्वी ती सदस्यांना दिली जाणार आहे. विषय समित्याच्या रिक्त पदांची निवड या सभेत करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सभा घ्यावी’
जिल्हा परिषदेची तहकुब सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून घेतल्यास सर्व सदस्यांना सहभागी होता येणार नाही. बहुतांशी सदस्य कामकाजापासून वंचित राहतील. विषय मांडून घाईघाईत मंजूरी घेतली जाईल. एकाच वेळी अनेक सदस्य बोलत राहिल्यास गोंधळ होईल. त्यामुळे ही सभा व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेऊ नये, ज्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तेथे सामाजिक अंतराची मर्यादा पाळून सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सभा घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...