पुण्यात अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई ः राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिनस्त अध्यापक व प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन करण्याच्या इतिवृत्तास काही सुधारणांसह बुधवारी (ता.२९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  

या संस्थेस स्वायत्तता मिळण्याच्या अनुषंगाने कंपनी कायद्याखाली ही संस्था स्थापन करण्यात येईल. यामध्ये राज्य शासनाचा सहभाग ४० टक्के, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा हिस्सा ५ टक्के, राज्यातील सर्व विद्यापीठांचा हिस्सा ४० टक्के, शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा हिस्सा ५ टक्के तसेच स्वयंसेवी संस्था व व्यवसाय संस्था यांचा हिस्सा १० टक्के राहील. 

विद्यापीठे तसेच महाविद्यालये, संस्था यांच्याकडून सदस्यत्व शुल्क घेण्यात येणार असून कॉर्पोरेट व बिझनेस हाऊसकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा कॉर्पस फंड तयार करण्यात येईल. या प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल व मुख्य सचिव हे त्याचे अध्यक्ष असतील.

संस्थेची उद्दिष्ट्ये 

  • उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांना उद्योग/व्यवसाय व त्यांच्या संबंधित क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान, शैक्षणिक पद्धती, तंत्रज्ञानाने समृद्ध करणे.
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासून प्रशिक्षण पद्धतीमध्ये गरजेनुरूप बदल करणे.
  • उद्योग क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या किंवा होणाऱ्या रोजगारसंधीच्या आधारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करून तसे बदल अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणे.
  • शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी शिकणे-शिकविण्याची पद्धती स्थापित करणे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनास प्रोत्साहित करणे.
  • शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमधील व इतर राज्यांतील शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करून अद्ययावत तंत्रज्ञानाधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यास पद्धतींबाबत शासनास शिफारस करणे व सल्ला देणे.
  • संस्थेमध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान, नेतृत्व विकास, बहू-अनुशासनात्मक अध्यापक समूह व सर्वसमावेशक शिक्षण अशी ५ उत्कृष्टता केंद्रे प्रस्तावित असून, याद्वारे सर्वसमावेशक असे प्रशिक्षण देणे त्याचप्रमाणे दुर्बल घटक, महिला व दिव्यांग यांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने संवेदशीलता निर्माण करण्याचाही उद्देश आहे.
  • पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांना १९९६ पासून दोन वेतनवाढी

    राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ज्या अधिव्याख्यात्यांनी १ जानेवारी १९९६ पूर्वी पीएच.डी पूर्ण केली आहे, त्यांना २७ जुलै १९९८ ऐवजी १ जानेवारी १९९६ पासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या इतिवृत्तास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

    राज्यातील पीएच.डी. अर्हताप्राप्त अधिव्याख्यात्यांना दोन वेतनवाढी मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र या वेतनवाढी १९९६ पासून करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com