संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण, लोहगाव येथे निरीक्षण केंद्रे
पुणे शहरातील लोहगाव, शिवाजीनगर आणि पाषाण येथे तापमान, पावसाचे प्रमाण, आर्द्रता यांसारख्या हवामानविषयक घटकांची नोंद केली जाते. या माहितीवर हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येतो. आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार शिवाजीनगरपेक्षा पाषाणचे हवामान थंड तर लोहगाव येथील हवामान उष्ण आहे. आगामी काळात याठिकाणचा हवामानाचा अंदाज पाच दिवस आधीच देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, हवामान अंदाज प्रमुख, पुणे वेधशाळा.
पुणे ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो तर काही ठिकाणी कोरडे हवामान असते. त्यामुळे एकाच शहरातील हवामानाची ही भिन्नता आश्चर्यकारक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान विभागाने पाऊले उचलली आहेत. हवामानाचा पूर्व अंदाज देण्यासाठी पुणे शहरातील पाषाण आणि लोहगाव येथे निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे पाषण आणि लोहगाव भागातील हवामानाचा पूर्व अंदाज देण्यात येत आहे.
बदलत्या हवामानामुळे गेल्या काही वर्षांपासून हवामान अंदाजासंदर्भात विविध प्रयोग केले जात आहे. राष्ट्रीय स्तर ते प्रादेशिक आणि स्थानिक स्तरापर्यंतच्या अंदाज अशा अनेक स्तरावर हवामान विभागाने आपल्या कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानात अनेक बदल केले आहेत. गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवरील हवामानातील बदल प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे या बदलांचा बारकाईने करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी हवामान विभागातर्फे पाषाण आणि लोहगाव येथे स्वतंत्र निरीक्षण केंद्रेदेखील उभारण्यात आली आहेत. याद्वारे लोहगाव आणि पाषाण येथील हवामानाचा अंदाज विभागाकडून दिला जात आहे.
- 1 of 1029
- ››