marathi agri agricultural news two center starts for pre weather prediction pune maharashtra | Agrowon

हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण, लोहगाव येथे निरीक्षण केंद्रे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

पुणे शहरातील लोहगाव, शिवाजीनगर आणि पाषाण येथे तापमान, पावसाचे प्रमाण, आर्द्रता यांसारख्या हवामानविषयक घटकांची नोंद केली जाते. या माहितीवर हवामानाचा अंदाज वर्तविण्यात येतो. आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार शिवाजीनगरपेक्षा पाषाणचे हवामान थंड तर लोहगाव येथील हवामान उष्ण आहे. आगामी काळात याठिकाणचा हवामानाचा अंदाज पाच दिवस आधीच देण्याचा प्रयत्न आहे. 
- डॉ. अनुपम कश्यपी, हवामान अंदाज प्रमुख, पुणे वेधशाळा.

पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो तर काही ठिकाणी कोरडे हवामान असते. त्यामुळे एकाच शहरातील हवामानाची ही भिन्नता आश्चर्यकारक आहे. याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान विभागाने पाऊले उचलली आहेत. हवामानाचा पूर्व अंदाज देण्यासाठी पुणे शहरातील पाषाण आणि लोहगाव येथे निरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राद्वारे पाषण आणि लोहगाव भागातील हवामानाचा पूर्व अंदाज देण्यात येत आहे.

बदलत्या हवामानामुळे गेल्या काही वर्षांपासून हवामान अंदाजासंदर्भात विविध प्रयोग केले जात आहे. राष्ट्रीय स्तर ते प्रादेशिक आणि स्थानिक स्तरापर्यंतच्या अंदाज अशा अनेक स्तरावर हवामान विभागाने आपल्या कार्यपद्धती आणि तंत्रज्ञानात अनेक बदल केले आहेत. गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवरील हवामानातील बदल प्रकर्षाने जाणवत असल्यामुळे या बदलांचा बारकाईने करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी हवामान विभागातर्फे पाषाण आणि लोहगाव येथे स्वतंत्र निरीक्षण केंद्रेदेखील उभारण्यात आली आहेत. याद्वारे लोहगाव आणि पाषाण येथील हवामानाचा अंदाज विभागाकडून दिला जात आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात `कृषी, उद्योग, ऊर्जा’...पुणे : जिल्ह्याच्या २०२०-२१ च्या प्रारूप वार्षिक...
‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात...सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा...
भंडारा : केवळ खरेदी केंद्रांवरच मिळतोय...भंडारा : महाविकास आघाडीकडून ५०० रुपयांचे बोनस आणि...
जळगाव जिल्ह्यात शासकीय धान्य खरेदीला...जळगाव : जिल्ह्यातील तीन केंद्रांमध्ये सोयाबीनची व...
सातारा जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची...
लातूर विभागात रब्बीत बारा लाख हेक्‍टरवर...लातूर : लातूर कृषी विभागांतर्गत लातूर,...
उद्योगांच्या दबावाने कापूस निर्यात बंदी...पुणे ः कापसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर...
गोंदिया : सौरकृषिपंप उभारणीचे कार्यादेश...गोंदिया  ः राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तापावर गुणकारी गुळवेलजळजळ होणे, बारीक ताप येणे, उष्णता वाढणे या...
सुधारित पद्धतीने करा हळद काढणीसर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९...
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...