दिल्लीतील जनतेने ‘जन की बात’  चालणार हे दाखवून दिले : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली. जनतेने लोकशाहीवरचा भरवसा कायम असल्याचे दाखविले. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा मतदारांनी फोडला असून, दिल्लीतील जनतेने ‘मन की बात’ नव्हे तर ‘जन की बात’ आता देशात चालणार हे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निकालानंतर दिली.

यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, की तथाकथित राष्ट्रीय विचारांच्या सरकारने सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाडूसमोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी-महारथी निवडणुकीत उतरवून अरविंद केजरीवाल यांची दहशतवाद्यांशी तुलना केली, आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करूनदेखील अरविंद केजरीवाल यांना ते पराभूत करू शकले नाहीत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com