Marathi Agri agricultural News virtual classroom project inauguration pune maharshtra | Agrowon

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लासरुम फायदेशीर : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

पुणे  ः  ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, त्यांच्याशी थेट संवाद व्हावा या उद्देशाने व्हर्चुअल क्लासरुम संकल्पना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होऊन भविष्यातील गुणवंत पिढी तयार होण्यास मदत होईल, असा विश्‍वास शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. 

पुणे  ः  ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, त्यांच्याशी थेट संवाद व्हावा या उद्देशाने व्हर्चुअल क्लासरुम संकल्पना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होऊन भविष्यातील गुणवंत पिढी तयार होण्यास मदत होईल, असा विश्‍वास शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला. 

पुण्यातील ई-बालभारतीमध्ये राज्यातील विविध ७२५ शाळांमधील व्हर्च्युअल क्लासरुम प्रकल्पाचे उद्‌घाटन मंत्री गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १४) झाले. या वेळी शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक (प्राथमिक) दत्तात्रय जगताप, माध्यमिक संचालक दिनकर पाटील, सुनील चौहान, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, बालभारतीचे संचालक विवेक गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी प्रा. गायकवाड यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी पाचवी इयत्तेमधील कार्तिक चव्हाण (रा. बऱ्हाणपूर, ता. पारनेर), यश बोकीस (दांडेगाव, भुम), वैदेही पवार (खावडी, रत्नागिरी) यांनी मंत्री गायकवाड यांना प्रश्‍न विचारले.  ‘‘शालेय शिक्षणाबरोबरच मैदानात भरपूर खेळा, भरपूर अभ्यास करा. आई-वडिलांवर प्रेम करा. तुम्हीही माझ्यासारखे मंत्री व्हाल. मीपण मराठी शाळेतून शिक्षण घेत, गणिताची शिक्षक झाले. आता शिक्षणमंत्री झाल्याचा आनंद आहे. तुम्हाला चांगले शिक्षण देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे यावेळी प्रा. गायकवाड म्हणाल्या.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...