संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

आजपासून (गुरूवार) ते सोमवारपर्यंत (ता.२४) मराठवाडा वगळता राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

पुणे  ः गेल्या दोन दिवस पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आजपासून (गुरूवार) ते सोमवारपर्यंत (ता.२४) मराठवाडा वगळता राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात रविवारी (ता.२३) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य प्रदेशाच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती अजूनही कायम आहे.

ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ आणि ५.८ किलोमीटर दरम्यान आहे. मॉन्सूनची आस कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com