Sugar Industry : राज्यात साखर उद्योगाची १ लाख कोटींची उलाढाल

एक लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल करीत आणि शेतकऱ्यांना आतापर्यंत ३१ हजार ८६१ कोटी रुपयांच्या एफआरपी देऊन राज्याचा २०२२-२३ चा ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे समाप्त झाला आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

Sugar Industry एक लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल करीत आणि शेतकऱ्यांना आतापर्यंत ३१ हजार ८६१ कोटी रुपयांच्या एफआरपी (FRP) देऊन राज्याचा २०२२-२३ चा ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) यशस्वीपणे समाप्त झाला आहे. राज्याने पहिल्यांदाच अशी विक्रमी उलाढाल केली आहे.

‘‘शेतकऱ्यांनी २१० साखर कारखान्यांना १३२१ लाख टन ऊस पुरवला. त्यापासून १०५ लाख टन साखर तयार झाली असून सरासरी उतारा १० टक्के आला आला आहे.

राज्याची वार्षिक इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) क्षमता आता २४४ कोटींवर गेल्यामुळे साखर उद्योगाची भरभराट होणार आहे’’, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

Sugar Export
Sugar Production : साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर राहण्याची शक्यता

“कोणतेही मोठे आंदोलन न होता यंदाचा १२१ दिवसांचा गाळप हंगाम पार पडला. राज्यात कोठेही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहिला नाही.

शेतकऱ्यांना एफआरपीदेखील ३१ हजार कोटींच्या पुढे म्हणजेच जवळपास ९५ टक्के अदा झाली आहे. यंदा २४ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन ऊस नोंदणी केली. साखर कारखान्यांनीदेखील देशात सर्वाधिक वेगाने विस्तारीकरण केले आहे.

त्यामुळे कारखान्यांची गाळप क्षमता आता प्रतिदिन ८.८२ लाख टनापर्यंत गेली आहे. यातून राज्याचे पहिल्या क्रमांकाचे नगदी पीक होण्यासाठी ऊस शेतीची वाटचाल सुरू झाली आहे,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

राज्यातील इथेनॉल निर्मिती क्षमता २४४ कोटी लिटर्सपर्यंत गेली आहे. कारखान्यांना तेल विपणन कंपन्यांनी यंदा १३२ कोटी लिटरचा कोटा मंजूर केला आहे.

त्यापैकी ४८ कोटी लिटरचा इथेनॉल पुरवठा झालेला आहे. इथेनॉलमुळे राज्याचा गाळप हंगाम यापुढे १५ एप्रिलच्या पुढे कधीही चालणार नाही.

दरम्यान, यंदा राज्यात ९०० हार्वेस्टर घेण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ५४ कारखान्यांना विस्तारीकरणाला मंजुरी दिली गेली आहे. नव्याने ५ कारखाने सुरू होण्याचे प्रस्ताव आहेत. मात्र, ४० कारखाने परवाने असूनही उभारले गेलेले नाहीत, असेही आयुक्त म्हणाले.

यावेळी साखर संचालक यशवंत गिरी (अर्थ), उत्तम इंदलकर (प्रशासन), सहसंचालक मंगेश तिटकारे (आस्थापना), राजेश सुरवसे (अर्थ), संतोष पाटील (उपपदार्थ) उपस्थित होते.

...अशी आहेत हंगामाची वैशिष्ट्ये

- एकूण ऊस गाळप...१०५२.८८ लाख टन

- एकूण साखर उत्पादन...१०५.३१ लाख टन

- सरासरी साखर उतारा...१० टक्के (याशिवाय अजून एक ते दीड टक्का इथेनॉलचा उतारा जास्तीचा असेल)

- सरासरी गाळप दिवस...१२१

- अधिकाधिक गाळप दिवस...१६४

- कमीत कमी गाळप दिवस...७

- स्थापित गाळप क्षमतेत वाढ...०.४५ लाख टन

Sugar Export
Sugar Industry : साखर कारखान्यांना मे साठी २४ लाख टनांचा कोटा

जिल्हानिहाय ऊस गाळप, साखर उत्पादन

जिल्हा–एकूण कारखाने-गाळप(लाख टनांत)-साखर उत्पादन (लाख क्विंटल)-उतारा टक्केवारी-सरासरी गाळप दिवस

जालना-५ -२४३६११३- २५३२७१०-१०.४ -१४०

पुणे-१७-१२६६८७८३- १२६४९८७० -९.९९- १३३

सातारा- १५ -९९४०८८२ -१०२६८१७० -१०.३३- १३०

परभणी -७- २८९४९८३ -२८७७९४० -९.९४-१२६

कोल्हापूर -२१- १४८१३२८६- १७२२१७५७- ११.६३-१२४

उस्मानाबाद-१३- ५०२०९४८- ४५१०३७७- ८.९८- १२४

सांगली- १५-८२५५२७४- ९३२०३७३- ११.२९- १२३

अहमदनगर- २३- १२४८९९२४- १२०६०४८३- ९.६६- १२३

छत्रपती संभाजीनगर- ७- २०६२५९८- २१९२२४६ १०.६३- १२३

बीड-८- ४२४३६७७- ३१४२०१५- ७.४- १२३

हिंगोली- ५- १५५६५५०- १६४२०२५- १०.५५- १२०

जळगांव- ३- ८०११८०- ७८९३३७- ९.८५- ११९-

सोलापूर- ३७- १८१६१६१३- १६२६२३२२- ८.९५- ११७

नांदेड- ६- १७७४४४१- १७७७६२०- १०.०२- ११५

नंदुरबार- ३- १४२८०६३- १४८३३०४- १०.३९- १११

लातूर- १२- ४३३९८०५- ४३८४९०६- १०.१- १११

नाशिक- ५- ११३५५६२- ११०२१६७- ९.७१- १०९-

नागपूर- २- २५३२६१- १४६६०५- ५.७९- १०९

भंडारा- १- १४५१०७- १३२५८०- ९.१४- १०१

बुलडाणा- १- ३३२८२- ३०१७२- ९.०७- ९४

यवतमाळ- ३- ७४६५१५- ७२०७५०- ९.६५-९२

वर्धा- १- ८५०२७- ६९३००- ८.१५- ७९

सर्वाधिक गाळप केलेले पाच कारखाने

कारखाना...गाळप (टनांत)...साखर उत्पादन (क्विंटल)

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माढा, सोलापूर...१८४१४२१...१६५२८००

गुरू कमोडिटी (जरंडेश्वर शुगर), कोरेगाव, सातारा...१८१८४२१...१८२६५००

जवाहर शेतकरी ससाका, हातकणंगले, कोल्हापूर...१८०१५८६...२२०७०७०

बारामती अॅग्रो, इंदापूर, पुणे...१६४३९०७...१४४८९५०

इंडिकॉन डेव्हलपर्स, कर्जत, नगर...१५४४९४०...१६३५०००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com