Cotton : गुजरातमध्ये नवीन कापूस १२ हजारांवर

देशातील काही बाजारापेठांमध्ये नवीन कापसाची आवक सुरु झाली. नवीन कापसाला यंदा चांगला दर मिळतोय. हरियानातील पालवाल जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीलाच नवीन कापूस दाखल झाला. त्यानंतर पंजाबमध्येही एक दोन बाजारांमध्ये कापसाची आवक झाली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

पुणेः हरियाना आणि पंजाबनंतर गुजरातमध्येही नवीन कापसाची आवक (New Cotton Arrival) होत आहे. नवीन कापसाची आवक (Cotton Arrival) कमी असून दर ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. बाजारात कापसाची (Cotton Market) आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील याचा अंदाज येईल, असं व्यापाऱ्यांचं मत आहे. मात्र देशातील कापूस (Cotton) बाजाराची स्थिती पाहता कापूस दर तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Cotton Rate
Cotton : कपाशीवर घोंगावतेय गुलाबी बोंड अळीचे संकट

देशातील काही बाजारापेठांमध्ये नवीन कापसाची आवक सुरु झाली. नवीन कापसाला यंदा चांगला दर मिळतोय. हरियानातील पालवाल जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीलाच नवीन कापूस दाखल झाला. त्यानंतर पंजाबमध्येही एक दोन बाजारांमध्ये कापसाची आवक झाली. आता गुजरातमधील काही बाजारांमध्ये नवीन कापसाच्या लिलावाचा मुहुर्त पार पडला. गुजरातमधील अमरेली, गोंडल आणि राजकोट या बाजारांमध्ये नव्या हंगामातील कापसाची आवक झाली. या बाजारांमध्ये जुन्या कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये दर मिळाला. तर नवीन कापसालाही याच दरम्यान दर मिळतोय.

Cotton Rate
Cotton : खारपाण पट्ट्यात पावसाने कपाशीची वाढ खुंटलेलीच

राजकोट बाजारात कापसाला १० हजार ते १२ हजार रुपये दर मिळाला. तर येथे गुरुवारी केवळ २५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. गोंडल बाजारात ४४ क्विंटल आवक होऊन १० हजार ते १२ हजार ६०० रुपयाने व्यवहार झाले. सध्याची आवक खूपच कमी आहे. सप्टेंबरच्या शेवटी बाजारातील आवक वाढेल. तसच सध्याचे भाव हे नगण्य आवकेमुळं आहेत. बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतर दर काय राहू शकतो, याचा अंदाज येईल, असं या बाजारांतील व्यापाऱ्यांनी सांगितलं.

Cotton Rate
Cotton : गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी शेती शाळेतून मार्गदर्शन

कापसाची पहिली वेचणी झाली तेव्हा पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झालेला नव्हता, असं गुजरातमधील शेतकऱ्यांना स्पष्ट केलं. मात्र महाराष्ट्रासह उत्तर भारत आणि गजरातमधूनही आता गुलाबी बोंडअळीचे अहवाल आले आहेत. पुढील महिनाभर हवामान कसे राहते? यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढेल की कमी होईल, हे ठरेल. मात्र शेतकऱ्यांनी पिकावर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

सध्या बाजारातील कापूस आवक कमी आहे. त्यामुळं दर तेजीत आहेत. मात्र आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील हे पाहवे लागेल, असं व्यापाऱ्यांचं म्हणण आहे. पण यंदा कापूस लागवड वाढली असली तरी पिकाचं मोठं नुकसान होतंय. महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसला. तर गुलाबी बोंडळीचाही प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळं कापूस उत्पादन गेल्यावर्षीएवढंच होऊ शकतं, असं जाणकारांनी सांगितलं. त्यामुळं कापसाचे दर यंदा चांगलेच राहतील. कापसाला ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com