Sugarcane FRP : सव्वाशे साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी थकविली

यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्यात येत असला तरी अजूनही एकरकमी एफआरपी देण्यात कारखाने फार गती घेत नसल्याचे चित्र आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

Sugarcane FRP News कोल्हापूर ः यंदाचा गळीत हंगाम (Sugarcane Crushing Season) अंतिम टप्यात येत असला तरी अजूनही एकरकमी एफआरपी (Sugarcane FRP) देण्यात कारखाने फार गती घेत नसल्याचे चित्र आहे.

हंगाम सुरू केलेल्या २०२ साखर कारखान्यांपैकी अजूनही १२६ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली नाही. एकूण ६३५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) १५ फेब्रुवारी अखेर झाले आहे.

या उसाची एफआरपीची रक्कम १९९२५ कोटी इतकी होते. या पैकी १८०३४ कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. अजूनही १८९१ कोटी रूपये ऊस उत्पादकांना देय आहेत.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : सोलापुरात ‘एफआरपी’ मिळेना

१०० टक्के एफआरपी दिलेले ७६ कारखाने आहेत. ८० ते ९९ टक्के एफआरपी ५३ कारखान्यांनी दिली आहे. ६० ते ७९ एफआरपी ३६ कारखान्यांनी दिली आहे. ५९ टक्क्यांपर्यंतची एफआरपी ३७ कारखान्यांनी दिली आहे. राज्यातील ७६ साखर कारखान्यांनी जानेवारी अखेर एफआरपीची पूर्ण म्हणजे १०० टक्के रक्कम दिली आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : फेब्रुवारी, मार्चमध्ये येणाऱ्या उसासासाठी वाढीव अनुदान

गेल्या दोन महिन्यात साखरेला फारशी मागणी नव्हती. दरही स्थिर असल्याने गेले दोन महिने साखर कारखानदारांसाठी फारसे समाधानकारक गेले नाहीत, यामुळे शेतकऱ्यांच्या देय रक्कमा रखडत असल्याचे एकरकमी एफआरपी न दिलेल्या कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.

ज्या कारखान्यांची पुरेशी साखर निर्यात झाली आहे, आणि ज्या साखर कारखान्यांचे इथेनॅाल प्रकल्प आहेत त्या कारखान्यांची परिस्थिती चांगली आहे.

एफआरपी देण्यात पश्‍चिम महाराष्ट्र आघाडीवर

सोलापूर, मराठवाडा, विदर्भ भागातील साखर कारखाने एफआरपीची रक्कम देण्यात मागे आहेत. या तुलनेत कोल्हापूर, पुणे, नगर विभागात तुलनेने चांगली परिस्थिती आहे. यंदाचा हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे.

पण गेल्या वर्षी पेक्षा यंदाचे चित्र काहीसे वेगळे आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखर कारखाने लवकर बंद होतील अशी शक्यता आहे. हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना अजूनही कारखान्यांची रखडत असलेली एफआरपी शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com