Sugarcane FRP : १३४ साखर कारखान्यांनी‘एफआरपी’ची रक्कम तटवली

यंदाचा हंगाम संपत आला तरी अजूनही राज्यातील १३४ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम तटवली आहे. हंगाम सुरू केलेल्या २०७ कारखान्यांपैकी केवळ ७३ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे.
Sugar Mill
Sugar MillAgrowon

Sugarcane Season कोल्‍हापूर ः यंदाचा हंगाम संपत आला तरी अजूनही राज्यातील १३४ साखर कारखान्यांनी एफआरपीची (Sugarcane FRP) रक्कम तटवली आहे. हंगाम सुरू केलेल्या २०७ कारखान्यांपैकी केवळ ७३ कारखान्यांनी एफआरपीची (FRP) पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे.

फेब्रुवारीअखेर राज्यात २६५८ कोटी रुपयांची एफआरपी अद्याप थकित आहे. ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत ६७ कारखान्यांनी, ६० ते ७९ टक्क्यांपर्यंत ३९ कारखान्यांनी, तर ५९ टक्क्यांपर्यंत २८ साखर कारखान्यांनी एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत ८७६ लाख टन उसाचे गाळप झाले.

फेब्रुवारीअखेर गाळप झालेल्या उसाची एकूण एफआरपीची रक्कम २७ हजार ४४३ कोटी रुपये इतकी होते. यापैकी २५ हजार ३९९ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

Sugar Mill
Sugarcane FRP : सोलापूर विभागात ‘एफआरपी’चे ८२२ कोटी थकित

राज्यात गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. यंदा कारखाने नियोजित वेळेपेक्षा सुमारे एक महिना बंद होत आहे. अनेक कारखान्यांचे ऊसगाळप दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाले. याचा परिणाम कारखान्यांच्या आर्थिक ताळेबंदावर झाला.

यामुळे ही एफआरपी देण्यास विलंब होत असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कारखान्यांची ऊसबिले अजूनही थकित असल्याचे चित्र आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील नामवंत व सुस्थितीत चालणाऱ्या कारखान्यांनी एफआरपीची बहुतांशी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. त्याच्या अन्य भागांत मात्र एफआरपी देण्याबाबत फारशी समाधानकारक स्थिती नाही.

Sugar Mill
Sugarcane FRP : नांदेड विभागात १०८ कोटींची ‘एफआरपी’ अद्याप बाकी

ज्या साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. त्यांची ऊसबिले धीम्या गतीने निघत आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे व नगर मध्ये १०० टक्के व ८० ते ९९ टक्क्यांपर्यंत एफआरपीची रक्कम देणाऱ्या कारखान्यांची संख्या अधिक आहे. यंदा इथेनॉलचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने ज्‍या कारखान्यांचे इथेनॉलचे प्रकल्‍प कार्यान्वित आहेत.

याचा फायदा शेतकऱ्यांची देणे लवकर होण्यावर झाला. ज्या कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट आहे त्या कारखान्याच्या रकमा मिळण्यास वेळ होत आहे. हंगाम संपवलेले कारखाने सध्या जमा खर्चाचा मेळ घालत आहेत.

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असल्याने साखरेला काही प्रमाणात दर व मागणी वाढेल व याचा अनुकूल परिणाम एफआरपी देण्यावर होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com