नगरला कांद्याला १९०० रुपये क्विंटलपर्यंत दर

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी रब्बी-उन्हाळी कांदा क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली. मात्र कांदा काढणीला सुरुवात होताच दरात पडझड सुरू झाली.
नगरला कांद्याला १९०० रुपये क्विंटलपर्यंत दर

नगर ः नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांत (Nagar APMC) कांद्याची आवक (Onion Arrival) स्थिर आहे. गेल्या आठ दिवसांपासून दरात (Onion Rate) काही प्रमाणात वाढ होत असून १९०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे कांद्याचे दर (Onion Prices) वाढण्याची आशा तयार झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर पडल्याने शेतकरी हतबल झाले होते.

नगरला कांद्याला १९०० रुपये क्विंटलपर्यंत दर
कृषी विद्यापीठाकडून कांदा बियाणे विक्री सुरू

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी रब्बी-उन्हाळी कांदा क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. सुमारे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली. मात्र कांदा काढणीला सुरुवात होताच दरात पडझड सुरू झाली. साधारण सहा महिन्यांपासून दर कमी मिळत होते. डिसेंबरमध्ये मिळणारा पंचवीस ते तीस रुपयांचा दर थेट दहा रुपयांवर आला होता. त्यावेळी जास्तीत जास्त दहा रुपयांचा दर मिळत असला तरी प्रत्यक्षात चार ते पाच रुपये किलोने कांदा विकावा लागला होता. बरेच दिवस कांद्याचे दर वाढत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते. सहा महिन्यांनंतर आता कांदा दरात हळूहळू वाढ होत आहे.

सध्या कांद्याची आवर स्थिर असली तरी दरात काही प्रमाणात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. नगरसोबत पारनेर, घोडेगाव (नेवासा), राहुरी, राहाता, कोपरगाव, अकोले, संगमनेर बाजार समितीतही कांद्याची आवक होत होत आहे. चार दिवसांपूर्वी घोडेगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली.

२८ हजार २४३ गोण्या आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी (ता. २३) कांद्याची २८ हजार २४३ गोण्या आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला १५०० ते १९०० रुपयांचा दर मिळाला. दोन नंबरच्या कांद्याला हजार ते १५०० रुपये, तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते हजार व चार नंबरच्या कांद्याला १०० ते ५०० रुपयांचा दर मिळाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com