Onion : नगर जिल्ह्यात पंचवीस-तीस लाख टन कांदा चाळीत पडून

गेल्या वर्षभरात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. त्यात रब्बी, उन्हाळी मिळून सुमारे दोन लाख हेक्टरच्या जवळपास कांदा क्षेत्र होते. खरीप, उन्हाळी कांदा काढून आता सहा ते सात महिने झाले. कांद्याला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीस साठवून ठेवला.
Onion
OnionAgrowon

नगर ः नगर जिल्ह्यात कांदा उत्पादनाकडे (Onion Production) शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून कांद्याचा दर (Onion Rate) स्थिर आहे. दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून (Onion Storage) ठेवला खरा, मात्र अजूनही दरवाढ होत नसल्याने आता शेतकरी हतबल झाले आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी चाळीत ठेऊन झाला आहे. त्यामुळे आता नुकसानीची (Onion Damage) भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आताही सुमारे पंचवीस ते तीस लाख टन कांदा चाळीस पडून आहे.

Onion
Onion : चुकीच्या निर्यात धोरणांमुळे कांदा उत्पादक हवालदिल

गेल्या वर्षभरात सुमारे सव्वादोन लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. त्यात रब्बी, उन्हाळी मिळून सुमारे दोन लाख हेक्टरच्या जवळपास कांदा क्षेत्र होते. खरीप, उन्हाळी कांदा काढून आता सहा ते सात महिने झाले. कांद्याला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीस साठवून ठेवला. यंदा जिल्ह्यात सुमारे ६० ते सत्तर लाख टनांच्या जवळपास कांदा निघाला. त्यातील आतापर्यंत शेतकऱ्यांनी ४० ते ५० टक्के कांदा विकला असला तरी अजूनही दर मिळेल या आशेने ५० टक्के कांदा चाळीत पडून आहे. वाढलेला उत्पादन खर्च, घटलेली उत्पादकता, केंद्र व राज्य शासनातर्फे काहीतरी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

Onion
Onion : कांदा व्यापारात सरकारी हस्तक्षेप नको

महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण भारतात सर्वाधिक मागणी असते. परंतु, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक राज्यांत कांद्याचे क्षेत्र वाढले. त्यामुळे दक्षिण भारतातील कांद्याची मागणी घटली. परंतु, उत्तर भारतात कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचे दर स्थिर राहिले. प्रतवारीनुसार आठशे ते दीड हजार रुपये प्रतिक्विंटल दरम्यान कांद्याला भाव मिळत आहे. त्यात, उत्पादन खर्चाची तोंड-मिळवणीसुद्धा होत नाही. त्यामुळे, आर्थिक फटका बसत आहे. संकटात कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भाववाढीच्या अपेक्षेने कांदा चाळीत साठविला आहे.

मे व जून महिन्यात नाफेडमार्फत १२०० ते १६०० रुपये क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांचा व नाफेडचा कांदा चाळीमध्ये खराब होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे, येत्या दीड-दोन महिन्यांत नाफेडचा व शेतकऱ्यांच्या चाळीतील ५० टक्के कांदा बाजारात येणार असल्याची शक्यता असल्याने कांदा दरात वाढ होण्याची आशा कमीच आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या नगर जिल्ह्यात सुमारे २५ ते ३० लाख टनांच्या जवळपास कांदा अजूनही शिल्लक आहे. कांदा खराब होऊन नुकसान होण्यापेक्षा आता शेतकरी मिळेल त्या दरात विक्री करू लागले आहेत.

राज्याच्या अनेक भागात कांदा क्षेत्र वाढत आहे. मात्र काही दिवसांपासून कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहेत. शासनाने महागाई, वाढती मजुरी आणि कांद्यावरील संकटांमुळे होणारे नुकसान पाहता, कांदा उत्पादकांचा विचार करून साधारण तीस ते चाळीस रुपये प्रति किलोदर मिळेल याबाबत उपाययोजना करावी.
संभाजीराव दहातोंडे पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ
आम्ही दरवाढ होईल याआशेने कांदा विक्री केला नाही. मात्र दरवाढ होत नाही. सध्या मिळत असलेला दर कांदा उत्पादकांना तोट्यात नेणारा आहे. मात्र आता जास्तीचा कालावधी होत असल्याने कांदा खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करत आहोत.
अतुल तांबे, कांदा उत्पादक शेतकरी, श्रीरामपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com