Cotton Market : कापूस उत्पादकांची व्यापाऱ्याकडून क्विंटलमागे ३० ते ३५ किलोंची लूट

शेतकऱ्यांची निकड, तसेच त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सदोष वजनकाट्याचा उपयोग करून एक क्विंटलमागे ३० ते ३५ किलो कापसाच्या लुटीचा प्रकार चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यात उघडकीस आला आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Jalgaon Cotton Market News : शेतकऱ्यांची निकड, तसेच त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन सदोष वजनकाट्याचा उपयोग करून एक क्विंटलमागे ३० ते ३५ किलो कापसाच्या लुटीचा (Cotton Loot) प्रकार चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यात उघडकीस आला आहे.

लोंजे (ता.चाळीसगाव) येथील शेतकऱ्यांच्या सजगतेने संबंधित व्यापारी, खरेदीदाराचा भंडाफोड करण्यात आला. याबाबत धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील व्यापाऱ्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Cotton Market Update)

लोंजे येथील शेतकरी मुन्ना साहेबराव चव्हाण या शेतकऱ्याने आपला ४० क्विंटल कापूस वेळोवेळी वेचणीनंतर मोजून घरात साठवून ठेवला होता. चव्हाण यांनी मुकटी येथील व्यापाऱ्यास त्याची विक्री केली. दर ७८०० रुपये प्रतिक्विंटल होता.

पण या कापसाचे वजन व्यापाऱ्याने तोलाई केल्यानंतर केवळ ३० क्विंटल एवढे भरले. आपला ४० क्विंटल कापूस मोजून किंवा तोलाई करून घरात साठविला होता, त्यात काही महिन्यातच १० क्विंटलची घट कशी होऊ शकते, अशी शंका चव्हाण यांना आली.

Cotton Market
Cotton Market: कापूस बाजार पुन्हा उभारी घेईल का?

ही बाब शेतकरी मुन्ना चव्हाण याने सरपंच व इतर शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. नंतर त्यांनी संबंधित व्यापाऱ्याला याचा जाब विचारला. या प्रकाराची माहिती चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिली. आमदार चव्हाण यांनीदेखील तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तोपर्यंत संबंधित व्यापारी गावातून निसटला.

Cotton Market
Cotton Market : देशातील कापसाची स्थिती काय?

शेतकरी व आमदार चव्हाण यांनी संबंधित वजनकाट्यावर गावात कापसाची तोलाई केली असता वजनकाटा सदोष आढळला. यानंतर आमदार चव्हाण व शेतकऱ्यांनी कापूस, ट्रक, वजनकाटा असा मुद्देमाल घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक यांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर संबंधित व्यापाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरा : आमदार चव्हाण

कापूस खरेदीत मापात पाप करून एक क्विंटल कापसामागे ३० ते ३५ किलो कापसाची लूट करण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. शेतकरी अस्मानी संकटांचा सामना करीत आहे. अशा फसव्या व्यापाऱ्यांचे पितळ उघडे पाडले जाईल.

कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक काटा वापरण्याचा आग्रह धरावा. तसेच खरेदीदार, व्यापाऱ्यांनीदेखील पारंपरिक वजनकाटा वापरू नये, असे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com