Cotton Rate : परभणी बाजार समितीअंतर्गत ३२ हजार क्विंटल कापूस खरेदी

कापसाच्या आवकेत विविध कारणांमुळे घट झाली आहे. त्याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला आहे. जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक जिनिंग कारखाने बंद आहेत.
 Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Market Update परभणी : मराठवाड्यातील कापसाची (Cotton Market) प्रमुख बाजारपेठ असलेल्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या (२०२२-२३) खरेदी हंगामात (Cotton Procurement) शनिवारपर्यंत (ता. ११) एकूण ३२ हजार ३२८ क्विंटल कापसाची एकूण खरेदी झाली.

कापसाच्या आवकेत (Cotton Arrival) विविध कारणांमुळे घट झाली आहे. त्याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावर झाला आहे. जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक जिनिंग कारखाने बंद आहेत.

दरम्यान, सोमवारी (ता. १३) परभणी बाजार समितीच्या मार्केट यार्डावर कापसाची १५० क्विंटल आवक होऊन प्रति क्विटंल किमान ७२८० ते कमाल ८३०५ रुपये तर सरासरी ७७९६ रुपये दर मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावर चालू खरेदी हंगामात २१ नोव्हेंबर रोजी जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदीस सुरुवात झाली.

 Cotton Rate
Cotton Market : कापसासाठी मार्च महिना महत्वाचा

त्या वेळी प्रति क्विंटल किमान ८९९० ते कमाल ९१०० तर सरासरी ९००० रुपयांपर्यंत दर मिळाले. त्यानंतर दरामध्ये घसरण सुरू झाली.

कमी दर मिळत असल्यामुळे अन्य ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये कापूस विक्रीसाठी नेत असल्याचे अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

 Cotton Rate
Cotton Market : देशातील कापूस बाजाराला आधार मिळण्यास पोषक स्थिती

या आधीच्या वर्षात परभणी बाजार समितीत दररोज हजारो क्विंटल कापसाची आवक होत असे. परंतु यंदा सुरुवातीचे काही माहिने दररोज ४०० ते ५०० क्विंटल आवक झाली. गेल्या काही दिवसांत आवक अजून कमी झाली आहे.

अनेक दिवस आवकच होत नाही. दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. त्यामुळे आवक कमी झाली, असे बाजार समितीकडून सांगतिले जात आहे. कापसाची आवक कमी असल्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न कमी झाले आहे.

या ठिकाणचे १३ पैकी केवळ ६ जिनिंग कारखाने सुरू आहेत. आवक कमी असल्यामुळे जिनिंग उद्योजकांना कापूस कमी पडत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com