Paddy Procurement : भात खरेदीसाठी यंदा ३८ केंद्रे

भात खरेदी-विक्रीसाठी रायगड जिल्ह्यात ३८ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यातील निवडक केंद्रांवर सोमवारपासून भाताची खरेदी सुरू होईल.
Paddy Procurement
Paddy ProcurementAgrowon

अलिबाग, जि. रायगड : भात खरेदी-विक्रीसाठी (Paddy Procurement) रायगड जिल्ह्यात ३८ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यातील निवडक केंद्रांवर सोमवारपासून भाताची खरेदी (Paddy) सुरू होईल. या वर्षी भात कापणी (Paddy Harvesting) संपण्यापूर्वीच खरेदी-विक्री केंद्र सुरू होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

Paddy Procurement
Paddy Harvesting : भातझोडणीच्या कामांना जिल्ह्यात वेग

सध्या ग्रामीण भागात हळव्या वाणातील भात पिकांबरोबरच निमगरवी वाणातील सर्व भातपिकाची कापणी अंतिम टप्प्यात आली आहे; परंतु पावसामुळे धान्यात आर्द्रता असल्याने ते सुकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

Paddy Procurement
Paddy Farming : ड्रम सीडर पेरणीतून पिकवला भात

रायगड जिल्‍ह्यात खरीप हंगामात भात हेच पीक प्रामुख्याने घेतले जात असल्याने मार्केटिंग फेडरेशनकडून भात खरेदी केव्हा सुरू होईल, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. दिवाळी दरम्यान पडलेल्या पावसाचा फटका येथील पिकाला बसला आहे.

पेण, अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भात शेतीत अद्याप पाणी असल्याने येथील कापणी संथगतीने सुरू आहे, तर रोहा, मुरूड, महाड या तालुक्यातील डोंगराळ भागातील कापणी पूर्णत्वास आल्‍याने शेतकऱ्यांची भाताच्या विक्रीची लगबग सुरू आहे. भाताला दिल्या जाणाऱ्या आधारभूत किमतीत राज्य सरकारने गेल्या वर्षापेक्षा ५० रुपयांनी वाढ करीत २०४० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com