
Soybean Market Update येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची (Soybean Arrival) चार हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. त्यास शनिवारी (ता. ६) किमान ४४५० ते कमाल ५२०१ रुपये दर (Soybean Rate) मिळाला.
वाशीम जिल्हा दर्जेदार सोयाबीन उत्पादनात अग्रेसर समजला जातो. संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक सोयाबीन आहे. अर्थकारण या पिकाभोवती फिरते. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीन हाच मुख्य शेतीमाल आहे.
वाशीमसह इतर बाजार समित्यांत वर्षभर सोयाबीनची मोठी उलाढाल होते. सध्या वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची चार हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक सुरु आहे. दरवाढीच्या उद्देशाने अनेकांनी साठवून ठेवलेले सोयाबीन हळूहळू विक्रीला येत आहे.
बाजारात हरभऱ्याचीही आवक दोन हजार क्विंटलवर आहे. शनिवारी बाजारात २३०० पोत्यांची आवक झाली. हरभरा किमान ४४१७ व कमाल ४७०० रुपये दराने विक्री झाला. बाजारात गव्हाची आवकही बऱ्यापैकी सुधारते आहे. शनिवारी ५०० पोत्यांची आवक झाली. गव्हाला १८५० ते २२५० रुपये दर मिळत आहे.
उडदाची जेमतेम, मुगाची अधिक आवक
बाजार समितीत उडदाची आवक जेमतेम प्रमाणात आहे. शनिवारी २५ पोते उडीद विक्रीला आला. त्यास ५८०० ते ६३०० रुपये दर भेटला. तर मुगाची आवक थोडी अधिक असून शनिवारी २२५ पोते माल विक्रीला आला. मुगाला ६६५० ते ७७०० दरम्यान दर मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांकडून सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.