Jowar Rate : दौंड तालुक्यात ज्वारीला ४५०१ रुपयांचा दर

दौंड तालुक्यात ज्वारीची एकूण १६८ क्विंटल आवक झाली आहे. ज्वारीस किमान ३०००, तर कमाल ४५०१ रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात ९७ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २९००, तर कमाल ४२०० रुपये दर मिळाला होता.
Jowar Rate
Jowar RateAgrowon

दौंड : दौंड तालुक्यात ज्वारीची (Jowar Arrival) एकूण १६८ क्विंटल आवक झाली आहे. ज्वारीस किमान ३०००, तर कमाल ४५०१ रुपये दर (Jowar Rate) मिळाला. मागील आठवड्यात ९७ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २९००, तर कमाल ४२०० रुपये दर मिळाला होता.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरात घट झाली आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ४८५० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २५० तर कमाल २२०० रुपये असा दर मिळाला.

Jowar Rate
Jowar Bajri Rate : बाजरीसह ज्वारीचे दर वधारले

लिंबांच्या ९१ डागांची आवक झाली. त्यास प्रतिडाग किमान २०१ तर कमाल ४५१ रुपये असा दर मिळाला. फ्लॉवरची ८०० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १०० ; तर कमाल ३०० रुपये दर मिळाला आहे.

कोथिंबिरीची १८,५९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान कमाल ३०० रुपये असा दर मिळाला. मेथीची २७३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १५०० व कमाल २००० रुपये असा दर मिळाला.

Jowar Rate
Jowar Bajri Rate : बाजरीसह ज्वारीचे दर वधारले

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - १००, वांगी-४००, दोडका-२५०, भेंडी -२००, कार्ली-३५०, हिरवी मिरची-३००, गवार-७००, भोपळा-१००, काकडी-२००, शिमला मिरची-४००, कोबी-१००.

कोबी, भोपळ्याच्या दरात घट

कोबीची ६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोकरिता किमान ८० तर कमाल १०० रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कोबीची ६० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोकरिता कमाल १८० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता. भोपळ्याची ५६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोकरिता किमान ५० तर कमाल १०० रुपये बाजारभाव मिळाला.

शेतीमालाची आवक आणि दर

*शेतीमाल आवक (क्विंटल) किमान दर (रु.) कमाल दर(रु.)

गहू ४२९ २२०० ३२००

बाजरी ४७८ १७०० ३२११

मूग २७ ६००० ६७०१

हरभरा ६० ३६५० ४८००

मका ३१६ १६०० २२००

उडीद २८ ५००० ६१००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com