
हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत (Hingoli APMC) धान्य बाजारांमध्ये (भुसार मार्केट) शुक्रवारी (ता. २०) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक (Soybean Arrival) होती. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ४८०० ते कमाल ५३५० रुपये, तर सरासरी ५०५२ रुपये दर मिळाले.
हिंगोली धान्य बाजारात मंगळवार (ता. १६) ते शुक्रवार (ता. २०) या कालावधीत सोयाबीनची एकूण ३ हजार २५ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला किमान ४८०० ते कमाल ५४०० रुपये दर मिळाले.
गुरुवारी (ता. १९) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४८५० ते कमाल ५३६० रुपये, तर सरासरी ५१०५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १८) सोयाबीनची ५२५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५३६६ रुपये, तर सरासरी ५१३३ रुपये दर मिळाले.
मंगळवारी (ता. १७) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५००५ ते कमाल ५४०० रुपये, तर सरासरी ५२०२ रुपये दर मिळाले. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनच्या दरात थोडी घसरण झाली आहे. परिणामी आवकदेखील थोडी कमी झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.