Soybean Rate
Soybean RateAgrowon

Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला ४८४९ ते ५४१५ रुपये दर

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात सोमवार (ता. ५) ते शनिवार (ता.१०) या कालावधीत सोयाबीनची ४४७२ क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४८४९ ते ५४१५ रुपये दर मिळाले.

हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात (Grain Market) सोमवार (ता. ५) ते शनिवार (ता.१०) या कालावधीत सोयाबीनची ४४७२ क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल सरासरी ४८४९ ते ५४१५ रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटणार

सोमवारी (ता.५) सोयाबीनची ११३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४८९९ ते कमाल ५५०० रुपये, तर सरासरी ५१९९ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ६) सोयाबीनची १००९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४०९९ ते कमाल ५६०० रुपये, तर सरासरी ४८४९ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.९) सोयाबीनची १२००क्विंटल आवक झाली.

Soybean Rate
Soybean Market : सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा आधार मिळणार

तर प्रतिक्विंटल किमान ५१३० ते कमाल ५७०० रुपये, तर सरासरी ५४१५ रुपये दर मिळाले.शनिवारी (ता.१०) सोयाबीनची ११३३ क्विंटल आवक होती. त्या वेळी प्रतिक्विंटल किमान ५०८५ ते कमाल ५६६५ रुपये, तर सरासरी ५३६० रुपये दर मिळाले.

मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. प्रतिक्विंटल किमान ६००० रुपये दर मिळावा, या अपेक्षेने शेतकरी सोयाबीन साठवून ठेवणे पसंत करत आहेत. त्यामुळे धान्य बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com