
Soybean Market Update हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती (Hingoli APMC) अंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शुक्रवारी (ता. २४) सोयाबीनची ६५० क्विंटल आवक (soybean Arrival) होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४९९० ते कमाल ५३७१ रुपये तर सरासरी ५१८० रुपये दर मिळाले.
हिंगोली बाजार समितीतील भुसार माल मार्केटमध्ये मंगळवार (ता. २१) ते शुक्रवार (ता. २४) या कालावधीत सोयाबीनची ३१५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५४१२ रुपये दर मिळाले.
गुरुवारी (ता. २३) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००५ ते कमाल ५४१२ रुपये तर सरासरी ५२०८ रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता. २२) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००५ ते कमाल ५४०१ रुपये तर सरासरी ५२०३ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २१) सोयाबीन ११०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५३३५ रुपये तर सरासरी ५११७ रुपये दर मिळाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.