Marigold Rate : परभणीत झेंडूला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये दर

दिवाळी लक्ष्मी पूजनामुळे येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये सोमवारी (ता. २४) झेंडूची २५०० क्विंटल आवक झाली होती.
Marigold Rate
Marigold RateAgrowon

परभणी ः दिवाळी लक्ष्मी पूजनामुळे (Diwali Lakshmi Pujan) येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये (Pathari Vegetable Market) सोमवारी (ता. २४) झेंडूची २५०० क्विंटल आवक झाली होती. झेंडूला प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल १५०० रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाले.

Marigold Rate
Soybean Rate : सोयाबीन बाजाराची स्थिती काय?

टोमॅटोची आवक वाढली आहे. सोमवारी (ता. २४) टोमॅटोची ३५०० क्रेट (७०० क्विंटल) आवक होऊन प्रतिक्रेट २०० ते ५०० रुपये (प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये) दर मिळाले.नगर, औरंगाबाद जिल्ह्यातून तसेच स्थानिक परिसरातून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या आठवड्यात टोमॅटोची २००० ते २५०० क्रेट (४०० ते ५०० क्विंटल) आवक असताना प्रतिक्रेट ४०० ते ७०० रुपये क्रेट (प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये) दर होते.कोथिंबिरीची आवक वाढली आहे.

Marigold Rate
Maize Rate : मक्याचा बाजार दबावात

सोमवारी (ता. २४) कोंथिबीर ८० क्विंटल असताना प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. मेथीची १२ हजार जुड्याची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. मिरच्या आवकेत वाढ झाली. मिरचीची ६० क्विंटल असताना प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. वांग्याची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले.

लिंबांची ३० क्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाले. फ्लॉवरची ८० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते ३००० दर मिळाले. कोबीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com