Soyabean Rate : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ५३७८ रुपये दर

हिंगोली धान्य बाजारात सोमवार (ता.१९) ते शनिवार (ता.२४) या कालावधीत सोयाबीनची एकूण ४५१० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९९० ते कमाल ५६५० रुपये दर मिळाले.
Soyabean market price Today | Soyabean Rate
Soyabean market price Today | Soyabean RateAgrowon

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समिती (Hingoli APMC) अंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केट) मध्ये शनिवारी (ता. २४) सोयाबीनची १५०० क्विंटल आवक (Soybean Arrival) झाली. सोयाबीनला (Soybean Rate) प्रतिक्विंटल किमान ५१५१ ते कमाल ५६०६ रुपये तर सरासरी ५३७८ रुपये दर मिळाले.

Soyabean market price Today | Soyabean Rate
Soybean Seed : केवळ बीजोत्पादनासाठी घ्या उन्हाळी सोयाबीन

हिंगोली धान्य बाजारात सोमवार (ता.१९) ते शनिवार (ता.२४) या कालावधीत सोयाबीनची एकूण ४५१० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९९० ते कमाल ५६५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२२) सोयाबीनची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५५९५ रुपये तर सरासरी ५२९७ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता.२१) सोयाबीनची ९४५ क्विंटल आवक असताना किमान ४९९० ते कमाल ५५३० रुपये तर सरासरी ५२६० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५०३० ते कमाल ५६११ रुपये तर सरासरी ५३२० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.१९) ६६५ क्विंटल आवक होऊन किमान ५१०० ते कमाल ५६५० रुपये तर सरासरी ५३७५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com