Tur Rate : हिंगोलीत तूर ७००० ते ७५६० रुपये

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार मार्केट) बुधवारी (ता. ३) तुरीची १३० क्विंटल आवक होती.
tur rate
tur rateagrowon

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार मार्केट) बुधवारी (ता. ३) तुरीची १३० क्विंटल आवक (Tur Arrival) होती. तुरीला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७५६० रुपये (Tur Rate Hingoli) तर सरासरी ७२८० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

tur rate
Tur : आयात तुरीतील तेजी बाजाराच्या पथ्यावर?

सध्या येथील धान्य बाजारामध्ये स्थानिक परिसरातून आठवड्यात एक दिवसआड ८० ते १५० क्विंटलपर्यंत तुरीची आवक होत आहे. शुक्रवारी (ता. २९) तुरीची ८० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ७५०० रुपये तर सरासरी ६७०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. २७) तुरीला किमान ६६०० ते कमाल ७१५५ रुपये तर सरासरी ६८७७ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २५) तुरीला प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ६९९० रुपये तर सरासरी ६७४५ रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com