Cotton Market : मानवतमध्ये कापूस प्रति क्विंटल ७००० ते ८०५५ रुपये

जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ६) कापसाच्या १०० ते ११० गाड्यांची आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८०५५ रुपये तर सरासरी ७९६९ रुपये दर मिळाले
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Market Rate News : परभणी ः जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार (Manavat APMC) समितीमध्ये सोमवारी (ता. ६) कापसाच्या १०० ते ११० गाड्यांची आवक (Cotton Arrival) होती. कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८०५५ रुपये तर सरासरी ७९६९ रुपये दर मिळाले

मानवत बाजार समितीत सोमवार (ता. ३०) ते शनिवार (ता. ४) या कालावधीत कापसाची १८ हजार २०० क्विंटल आवक झाली असताना प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८२७० रुपये तर सरासरी रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Procurement : ‘सीसीआयची’ कापूस खरेदी बंद का?

शनिवारी (ता. ४) कापसाची २४०० क्विंटल आवक होती. किमान ७००० ते कमाल ८१२५ रुपये तर सरासरी ८०५० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. ३) कापसाची २७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ८१५० रुपये तर सरासरी ८०५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २) कापसाची २२०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७४०० ते कमाल ८१४५ रुपये तर सरासरी ८०३० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. १) कापसाची ४२०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७४०० ते कमाल ८१८० रुपये तर सरासरी ८१०० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. ३१) कापसाची ३५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान७४०० ते कमाल ८२१० रुपये तर सरासरी ८१४० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ३०) कापसाची ३२०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७५०० ते कमाल ८२७० रुपये तर सरासरी ८१६० रुपये दर मिळाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com