Cotton Rate : मानवत बाजार समितीमध्ये कापूस ८००० ते ८७०५ रुपये

परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २) कापसाच्या ५० ते ६० गाड्यांची आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८७०५ रुपये तर सरासरी ८५७५ रुपये दर मिळाले.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत (Manvat APMC) सोमवारी (ता. २) कापसाच्या (Cotton Arrival) ५० ते ६० गाड्यांची आवक होती. कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८७०५ रुपये तर सरासरी ८५७५ रुपये दर मिळाले.

Cotton Rate
Cotton Rate : आठवडाभरात कसा राहीला कापूस बाजार?

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ३१) कापसाच्या ५० ते ५५ गाड्या आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८५५५ रुपये दर तर सरासरी ८३५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ३०) कापसाची ५० ते ६० गाड्या आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७६०० ते कमाल ८३९५ रुपये तर सरासरी ८२५० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २९ ) कापसाच्या ५० ते ५५ गाड्यांची आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७३०० ते कमाल ८११० रुपये तर सरासरी ७८९० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २८) कापसाच्या ३० गाड्यांची आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७४०० ते कमाल ८०५० रुपये तर सरासरी तर ७८९० रुपये दर मिळाले.

Cotton Rate
Cotton Rate: आज कापसाला कुठे किती दर मिळला?

सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. २) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ८९५० रुपये तर सरासरी ८८७५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता. ३१) कापसाला प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८३०५ रुपये तर सरासरी ८२६५ रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता. ३०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७६०५ ते कमाल ८२०० रुपये तर सरासरी ८१६५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २९) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७६५० ते कमाल ८१९० रुपये तर सरासरी ७८५५ रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत गुरुवारी (ता. २९ कापसाची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७४०० ते कमाल ८००० रुपये तर सरासरी ७५०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २८) कापसाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७३०० ते कमाल ७७०० रुपये तर सरासरी ७५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com