Cotton Market : मानवत बाजार समितीत कापूस ८००० ते ८९५० रुपये

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. ७) कापसाची ३००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८९५० रुपये दर तर सरासरी ८८५० रुपये दर मिळाले.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

परभणी ः जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. ७) कापसाची ३००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८९५० रुपये दर तर सरासरी ८८५० रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Market : बाजारातील कापूस आवक कमीच

शुक्रवारी (ता. ६) कापसाची २६०० क्विंटल असताना प्रतिक्विंटलला किमान ७८०० ते कमाल ८९४५ रुपये तर सरासरी ८८३५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ५) कापसाची २४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८९६५ रुपये तर सरासरी ८८५० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ४) कापसाची १५०० क्विंटल आवक (Cotton Arrival) असताना प्रतिक्विंटल किमान ८१०० ते कमाल ८८३० रुपये तर सरासरी तर ८७०० रुपये दर (Cotton Rate) मिळाले. मंगळवारी (ता. ३) कापसाची ३००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७९०० ते कमाल ८७२० रुपये तर सरासरी ८६५० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत सोमवारी (ता. ९) कापसाला प्रतिक्विटंल किमान ८१०० ते कमाल ८७९० रुपये तर सरासरी ८७६० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ६) कापसाची ६७५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८१७० ते कमाल ८८०५ रुपये तर सरासरी ८७८० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. ५) कापसाची ७९२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ८१०० ते कमाल ८७९० रुपये तर सरासरी ८६८० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ४) कापसाची ८४२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७८५० ते कमाल ८८०० रुपये तर सरासरी ८६७५ रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Market : ‘स्मार्ट’अंतर्गत कापसापासून रुई निर्मिती प्रक्रियेस सुरुवात

दराच्या अपेक्षेने घरातच साठवला कापूस

डिसेंबरच्या तुलनेत नवीन वर्षात कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. कमाल दर नऊ हजार रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे मानवत बाजार समितीतील कापसाच्या आवकेत वाढ झाली आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दराची अपेक्षा असल्याने त्यांनी सध्या कापूस घरातच साठवून ठेवला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com