Cotton Rate : बारामती बाजार समितीत कापसाला ९००० रुपये दर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डमध्ये बुधवारी (ता. ९) कापसाला प्रति क्विंटल ९००० रुपये दर मिळाला.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon

बारामती : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Baramati APMC) मुख्य यार्डमध्ये बुधवारी (ता. ९) कापसाला प्रति क्विंटल ९००० रुपये दर (Cotton Rate) मिळाला. मागणी व बाहेरील खरेदीदार येत असल्याने कापसाच्या दरात वाढ होत असून, आवारात गुरुवारी (ता. १०) सुमारे १०० क्विंटल आवक (Cotton Arrival) झाली. कापसाला सरासरी ८५०० चा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

Cotton Rate
Cotton Rate : कापसाची झळाळी कायम

आठवड्यातील बुधवार आणि शनिवार या दिवशी कापसाचे लिलाव सुरू असतात. कापसाच्या आवकेत वाढ झाल्यास आणखी बाहेरील पेठेतील खरेदीदार येतील. ३५ वर्षांनंतर परत कापसाचे लिलाव होत आहेत. त्यामुळे भविष्यात बारामती बाजार आवारात कापसाची मोठी आवक होईल व कॉटन मार्केट म्हणून बारामती बाजारपेठ पुन्हा आपली ओळख निर्माण करेल.

Cotton Rate
Cotton : कापूस संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांची प्रक्षेत्र भेट

बारामती बाजार समितीमध्ये कापूस लिलावास प्रारंभ झाल्यापासून कापसाला मागणी वाढत आहे. कापसाच्या दरात आणखी वाढ होईल. गुरुवारी बीड व इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतला. कापूस विक्री आवाराबाहेर परस्पर दर ठरवून न करता स्पर्धात्मक लिलावात विक्री करणे भविष्याच्या दृष्टीने शेतकरी हिताचे आहे. आवारात कुठलीही कटती नाही.

ज्या त्या दिवशी लिलाव, वजनमाप आणि पेमेंट शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे बाजारपेठेत कापूस आवक वाढेल, असा विश्वास बारामतीचे अडते व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. मार्केटमध्ये कापूस विक्री सुरू केल्याने भविष्यात कापसाची लागवड वाढणार आहे. त्यासाठी बाजार समितीतर्फे लवकरच कापूस उत्पादकांचा मेळावा घेणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com