Tur Arrival : मलकापूर बाजार समितीत महिनाभरात तुरीची ९६ हजार क्विंटल आवक

विदर्भ-खानदेशच्या सीमेवर असलेल्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची दररोज पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक सध्या होत आहे.
Tur Arrivals
Tur Arrivals Agrowon

Tur Market बुलडाणा ः विदर्भ-खानदेशच्या सीमेवर असलेल्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची दररोज पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक सध्या होत आहे. सध्या आवक वाढत आहे.

जानेवारी महिन्यात तब्बल ९६ हजार ५८५ क्विंटल तुरीची आवक झाली होती, अशी माहिती बाजार समिती सूत्रांकडून मिळाली.

पश्‍चिम विदर्भातील एक प्रमुख बाजार समिती म्हणून मलकापूर प्रसिद्ध आहे. मका, तूर, कापूस व इतर धान्यांची येथे विक्री केली जाते. सध्या ही बाजार समिती तुरीच्या आवकेने फुलून गेली आहे.

Tur Arrivals
Tur Market: तूर उत्पादन ३० लाख टनांवरच स्थिरावणार?

या हंगामातील नवीन तुरीची एकीकडे काढणी सुरू आहे तर दुसरीकडे तयार झालेला हा शेतीमाल थेट बाजारात विक्रीला येत आहे.

या भागात कापूस, सोयाबीन, तूर ही प्रमुख पिके आहेत. सध्या दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करण्यासाठी तुरीसारखे पीक विक्री करून शेतकरी गरज भागवत आहेत.

Tur Arrivals
Tur Crop Damage : तूर नुकसानभरपाईची घोषणा कागदावरच

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तुरीची काढणी सुरू झाली होती. त्यामुळे बाजारात या काळात दररोज तुरीच्या आवकेत वाढ होत गेली.

१ ते ३१ जानेवारी या काळात तब्बल ९६ हजार ५८५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. बाजारात दररोज येणाऱ्या मालाचा लिलाव करून मोजमाप केले जाते.

मध्यंतरी दरावरून शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर नियमितपणे हा बाजार भरत आहे. तुरीच्या आवकेमुळे बाजार समितीचे संपूर्ण प्रांगण फुलून जाते.

आमच्या बाजार समितीत रोजची जितकी आवक त्याचा लिलाव त्याच दिवशी होऊन मोजमाप केले जाते. शेतकऱ्यांना २४ तासांत चुकारे दिले जातात. खुली हर्राशी (लिलाव) पद्धत असल्याने दर चांगले मिळतात.

खरेदीदार अधिक आहेत. त्यामुळेच स्थानिकसह जळगावमधील पाचोरा, मुक्ताईनगर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर अशा भागांतूनही शेतीमालाची आवक होते.

- अजय जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मलकापूर, जि. बुलडाणा

गेल्या आठवड्यातील आवक

तारीख सरासरी दर (रुपयांत) आवक (क्विंटल)

२५ जानेवारी ६८११ ५८४०

२७ जानेवारी ७११० ४२०५

२८ जानेवारी ६७४० ४७२०

३० जानेवारी ७२०० ५८६०

३१ जानेवारी ६८५० ६५६०

१ फेब्रुवारी ६९०० ७१८५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com