Paddy Procurement : सिंधुदुर्गात ९९ हजार क्विंटल भातखरेदी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात खरीप हंगामात भातपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टरवर भात उत्पादन घेतले जाते.
Rice
Rice Agrowon

Sindhudurag News : जिल्ह्यात ९९ हजार ८३४ क्विंटल भातखरेदी (Paddy Procurement) झाली असून, आतापर्यंतची ही सर्वाधिक खरेदी आहे. त्यापैकी कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ३९ हजार २९७.३३ क्विंटल भातखरेदी झाली आहे.

जिल्ह्यातील ५ हजार ५१६ शेतकऱ्यांनी भातविक्री (Paddy MSP) केलेली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून भातखरेदीस प्रारंभ झाला. ऑनलाइन नोंदणी असल्यामुळे जिल्ह्यातील सहा ते सात केंद्रांवरच धीम्यागतीने भातखरेदी सुरू होती. परंतु त्यानंतर तालुका खरेदी-विक्री संघाने कार्यालयामधून नोंदणी सुरू केली.

त्यानंतर डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ भातखरेदी केंद्रांवर गतीने भातखरेदी सुरू झाली. या वर्षी शासनाने भाताला प्रतिक्विंटल २ हजार ४० रुपये दर जाहीर केला आहे.

Rice
Rice Export : तांदूळ निर्यातीवरील बंधने कायम राहणार

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात खरीप हंगामात भातपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टरवर भात उत्पादन घेतले जाते. या वर्षी जिल्ह्यातील ३७ भातखरेदी केंद्रांवर सुरू असलेली प्रकिया २८ फेब्रुवारीला थांबविण्यात आली.

मंगळवार (ता. २८) सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ५१६ शेतकऱ्यांनी ९९ हजार ८३४ क्विंटल भातविक्री केली आहे. जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ३९ हजार २९७.३३ क्विंटल भातखरेदी झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातविक्री केलेल्या भातांची २० कोटी ३६ लाख ६२ हजार ५२२ रुपये इतकी रक्कम होत असून त्यापैकी सुमारे १४ कोटीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. उर्वरित रक्कमदेखील येत्या काही दिवसांत जमा होणार आहे. गेल्या वर्षी तुलनेत जिल्ह्यात ८९ हजार ५१० क्विंटल भातखरेदी झाली होती.

तालुका भात (क्विंटलमध्ये)

कुडाळ - ३९ हजार २९७.४०

कणकवली - १९ हजार ६११.६

सावंतवाडी - १४ हजार ३४९.३३

मालवण - ७ हजार २५७

वेंगुर्ला - ६ हजार १५०.२८

वैभववाडी - ६ हजार ८५०

देवगड - ३ हजार ७०१.६४

दोडामार्ग - १ हजार ८६०.४०

Rice
Rice Crop Advisory : कृषी सल्ला : उन्हाळी भात
जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपासून जिल्ह्यातील ३७ भातखरेदी केंद्रांवर भातखरेदी सुरू होती.२८ फेब्रुवारीपर्यंत ९९ हजार ८३४.५७ क्विंटल भातखरेदी झालेली आहे. जिल्ह्यातील ५ हजार ५१६ शेतकऱ्यांनी भातविक्री केलेली आहे.
एन. जी. देसाई, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com