गरजवंतांमध्ये स्पर्धा लावण्याची व्यूहरचना

वेदांता-फॉक्सॉन प्रकल्प जो महाराष्ट्रात येईल असे म्हटले जात होते तो गुजरातमध्ये जात आहे, याबद्दल गदारोळ माजला आहे. पण हे जे काही घडते ते तसेच का घडते, असे का नाही घडत असे विचार आपल्या मनाला शिवत नाहीत यात त्या प्रणालीचे यश आहे.
Vedanta Foxconn
Vedanta FoxconnAgrowon

वेदांता-फॉक्सॉन प्रकल्प (Vedanta Fozconn Project) जो महाराष्ट्रात येईल असे म्हटले जात होते तो गुजरातमध्ये (Vedanta Foxconn Gujrat) जात आहे, याबद्दल गदारोळ माजला आहे. पण हे जे काही घडते ते तसेच का घडते, असे का नाही घडत असे विचार आपल्या मनाला शिवत नाहीत यात त्या प्रणालीचे यश आहे. म्हणून नेहमी मॅक्रो, वैश्‍विक आर्थिक तत्वज्ञान समजून घेतले पाहिजे.

Vedanta Foxconn
Agriculture Machinery : कृषी अवजारांवर होतेय सातत्यपूर्ण संशोधन

सुमारे ४० वर्षांपूर्वी देशांच्या अर्थव्यवस्थांच्या जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामागची ढकलशक्ती कॉर्पोरेट-वित्त जागतिक भांडवल होते. जागतिक भांडवलाला ठिकठिकाणी गुंतवून घ्यायचे होते आणि स्वतःत अजून वाढ करायची होती. मुद्दामहून सांगतो, आपण ज्या वेळी जागतिक असे म्हणतो त्यात भारतातील कॉर्पोरेट भांडवलदेखील अनुस्यूत असते. हे वाक्य दोनदा वाचा, म्हणजे बायनरीमध्ये विचार करणार नाही.

Vedanta Foxconn
Agriculture Supply Chain : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

कुंठितावस्थेत गेलेल्या विकसित देशांची भांडवल शोषून घ्यायची क्षमता नव्हती, त्यामुळे गरीब विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था हाच वाढीचा मार्ग होता. अडचण होती ती गरीब विकसनशील देशांमधील कामगार, पर्यावरण, आयात-निर्यात कर, नैसर्गिक साधनसामग्री विषयक कायद्यांच्या काठिण्याची.

जागतिक भांडवलशाहीने आपल्या अडचणीचे रूपांतर संधीत केले. गरीब विकसनशील देशांमध्ये स्पर्धा लावली. कोण कमी वेतनात मानवी श्रम देतो, कोण पर्यावरणाची हानी करून घ्यायला तयार आहे, कोण जमीन, पाणी, जंगले कवडीमोल भावाने द्यायला तयार आहे... हे तिथंच थांबलं नाही. ज्या देशांमध्ये जायचे त्या देशांच्या राज्यांमध्येही त्याच गोष्टींसाठी स्पर्धा लावली. त्या शेजारच्या प्रांतापेक्षा आम्ही आमचे अधिक शोषण करून घ्यायला तयार आहोत, अशी ग्वाही राज्ये द्यायला लागली.

हे इथेच थांबत नाही. कुटुंबांसाठी आमदनी मिळवण्यासाठी लाखो, कोटी श्रमिक श्रमाच्या बाजारपेठेत आपले श्रम विकायला तयार असतात. मी त्याच्यापेक्षा कमी वेतनात श्रम विकायला तयार आहे, मी कामाच्या ठिकाणी नरकासमान स्थितीत काम करायला तयार आहे.... अजून काढू यादी? गरजवंतांमध्ये स्पर्धा लावल्याची? आणि दुसऱ्या बाजूला या गरजवंतांनी संघटित होऊन आपल्या हितसंबंधांना धक्का पोहोचवू यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. आपण आपल्या जुन्या पुराण्या परिभाषेत बोथट झालेल्या विश्‍लेषणात्मक फ्रेम घेऊन बसलो आहोत.

एक देश एक कर प्रणाली, एक देश एक भाषा, एक देश एक संस्कृती, एक देश एक शिक्षण पद्धती... अशा प्रकारे देशाच्या एकजिनसीकरणाची, फेडरल संरचनेत राज्यांचे दात पाडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मग एक देश एकाच प्रकराची जल, जंगल, जमीन, कामगार, पर्यावरण विषयक कायदे का नाहीत? अर्थ निरक्षर, अर्थ अडाणी आहोत आपण समुदाय म्हणून.

प्रश्‍न विचारू नका; हा प्रश्‍न आपल्या मनाला शिवत कसा नाही, हा प्रश्‍न पब्लिक डिस्कोर्समध्ये येत कसा नाही यावर विचार करा. त्या प्रणालीने खूप होमवर्क केले आहे. आपण स्वतःला नैतिक-अनैतिक, चांगली-वाईट / क्रोनिझम, भाजप-काँग्रेस या बायनरीत अडकवून घेतले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com