
Pune APMC Update पुणे ः गुढीपाडव्यानिमित्त (Gudhi Padwa Festival) कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाची (mango Arrival) लगबग सुरू झाली असून, यावर्षी आंबा हंगामावर (mango Season) पहिल्या टप्प्यात हवामानाचे सावट होते तरी पहिल्या टप्प्यात चांगले उत्पादन असले तरी अक्षय तृतीयेपर्यंत किती आंबा उपलब्ध राहील याबाबत मात्र साशंकता आंबा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. गुढीपाडव्याला मात्र मुबलक आंबा उपलब्ध राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पुणे बाजार समितीमध्ये गेल्या १५ दिवसांपासून कोकणातून कच्चा हापूस आंब्याची आवक सुरू झाली असून, सध्या दररोज दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत आहे, अशी माहिती आडते असोसिएशनचे सचिव आणि आंबा आडतदार करण जाधव यांनी दिली.
जाधव म्हणाले, की गुढीपाडव्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड बाजार समितीमधील व्यापारी आणि आडत्यांनी कच्चा आंबा खरेदी करून, तो पिकवणगृहात पिकविण्यासाठी ठेवला आहे. यामुळे गुढीपाडव्याला किमान ८ ते १० हजार पेट्या बाजारात उपलब्ध असतील.
पहिल्या टप्प्यात चांगला आंबा येत असून, हवामान बदलांमुळे मोहोराचा दुसरा टप्पा कमी झाल्याची शेतकऱ्याची माहिती आहे. यामुळे अक्षय तृतीयेला किती आंबा उपलब्ध राहील याचा अंदाज आताच बांधता येत नाही.
गावखडी पावस (जि. रत्नागिरी) येथील शेतकरी मंदार कदम म्हणाले, की माझी स्वतःची १ हजार झाडे असून, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चांगला मोहोर होता.
त्यामुळे त्याचे उत्पादन मार्चमध्ये चांगले आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत मार्चमधील उत्पादन दुप्पट आहे.
तर डिसेंबरमधील थंडीचे दिवस आणि प्रमाण कमी राहिल्याने मोहोराचे प्रमाण कमी होते. याचे मे मध्ये मिळणारे उत्पादन कमी राहिले. परिणामी अक्षय तृतीयेला आंबा कमी राहील अशी शक्यता आहे.
पुणे बाजार समितीमधील दर
कच्चा आंबा - ४ ते ६ डझन - २ हजार ते ३ हजार रुपये, ५ ते ७ डझन - ३ ते ५ हजार रुपये
तयार आंबा - ४ ते ६ डझन - ३ ते ४ हजार रुपये, ५ ते ७ डझन - ४ ते ७ हजार रुपये
मुंबई बाजार समितीत ३७ हजार पेट्यांची आवक
मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. १७) कोकणातून ३७ हजार ५१९ पेट्यांची आवक झाली होती. हीच आवक गेल्यावर्षी १० ते १२ हजार होती. याचे कारण यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मोहोर शेतकऱ्यांनी टिकविला आणि त्याचे उत्पादन आता मार्चमध्ये भरपूर आहे.
यामुळे गुढीपाडव्याला मुबलक आंबा बाजारात असेल. मात्र मे मध्ये कमी प्रमाणात आंबा उपलब्ध होईल, अशी माहिती मुंबई बाजार समितीचे संचालक आणि आंबा व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.