Soybean: वायदेबाजारावरील बंदी उठवणार का?

केंद्र सरकारने २० डिसेंबर रोजी प्रमुख शेतीमालाच्या वायद्यांवर बंदीची कुऱ्हाड चालवली. त्यात सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल, मूग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल, हरभरा यांचा समावेश आहे.
Soybean: वायदेबाजारावरील बंदी उठवणार का?

पुणेः शेतमालाचे (Agriculture Produce) दर वाढल्यानंतर सरकार पहिले वायदे बंद करते, हा आजवरचा अनुभव आहे. वायदेबाजारात (Future Market) स्पेक्युलेशन होऊन अवास्तव दरवाढ होते, असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु मागील काही वर्षांत वायदे बाजारात शेतकरी उत्पादक कंपन्याही उतरल्या आहेत. या वायद्यांमधील दरामुळे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची लागवड (Crop Cultivation) करावी, माल केव्हा विकावा हे निर्णय घेण्यास मदत होते. त्यामुळे सरकारने तातडीने बंद केलेले शेतीमालाचे वायदे तातडीने सुरु करावेत, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली.

Soybean: वायदेबाजारावरील बंदी उठवणार का?
‘स्वाभिमानी’कडून ‘वायदे  बाजार बंदी’ निर्णयाची होळी

केंद्र सरकारने २० डिसेंबर रोजी प्रमुख शेतीमालाच्या वायद्यांवर बंदीची कुऱ्हाड चालवली. त्यात सोयाबीन, सोयातेल, कच्चे पामतेल, मूग, गहू, बिगर बासमती भात, मोहरी, मोहरी तेल, हरभरा यांचा समावेश आहे. ही बंदी २० डिसेंबर २०२२ पर्यंत असणार आहे. एनसीडीईएक्सवरील वाद्यांमध्ये सट्टेबाजी आणि साठेबाजी होत असल्याचं सरकारचं म्हणणं होतं. मात्र वायदेबंदीनंतरही सोयाबीनच्या दारने उसळी घेतली होती. सरकारने खाद्येतेल आयातशुल्क कमी केले, साठामर्यादा लावली, सोयापेंड आयातीला परवानगी दिली. मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. सोयाबीनची विक्री एकाच वेळी न करता टप्प्यांमध्ये केली. परिणामी बाजारात आवकेचा दबाव वाढला नाही. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली. ब्राझील आणि अर्जेंटीनात उत्पादन घटले. त्यामुळे ऐन हंगामातही देशात सोयाबीन दर नरमले नाहीत.

Soybean: वायदेबाजारावरील बंदी उठवणार का?
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या भावामध्ये वाढ

परंतु चालू खरिपात सोयाबीन पेरा वाढण्याची शक्यता आहे. त्यातच सोयाबीन दर सध्या सरासरी ६ हजारांच्या दरम्यान आहेत. खाद्यतेलाचेही दर कमी होत असल्याचा दावा सरकारने केला. पामतेलाचे दर उचांकापासून जवळपास ५० टक्क्यांनी घटले. तसेच हरभऱ्याचे दर हंगामात हमीभावापेक्षा कमीच राहिले. आताही हरभऱ्याचा सरासरी दर ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सोयाबीनसह सर्व शेतीमालांचे वायदे सुरु करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. खरिपातील सोयाबीन पीक जोमात आहे. पाऊसही चांगला झाला. ऑक्टोबरपासून पिकाची काढणी सुरु होईल. महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सोयाबीन हे खरिपातील महत्वाचं पीकं बनलं. त्यामुळे सोयाबीनला चांगला दर मिळाला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. म्हणून सरकारने सोयाबीनचे वायदे तात्काळ सुरू करावेत, असे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

वायद्यांमुळे शेतकऱ्यांना लागवडीच्या काळात दराचा अंदाज येऊ शकतो. तसेच पुढील काही काही महिन्यांचा दर पाहून कोणतं पीक घ्यायचं? हे ही ठरवू शकतात. पीक हाती येण्याच्या आधीच पिकाचा दर निश्चित करून वायदा घेऊ शकतात. परंतु वायदेबंदीमुळे शेतकऱ्यांना दराचा अंदाज येत नाही. व्यापारी सांगेल त्या दराला माल विकावा लागतो. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.

वायद्यांमुळे दराची माहिती मिळते. एकदा वायदा घेतला की त्या दराची हमी मिळते. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या वायदे बाजाराकडे वळत आहेत. वायदेबाजारामुळे शेतमालाच्या दरातील चढ-उतारापासून संरक्षण मिळू शकते. ते एक जोखीम व्यवस्थापनाचं म्हणजे हेजिंगचं साधन आहे, असं या क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे. सरकारने वायदे सुरु केल्यास शेतीमाल केव्हा विकायचा याचा निर्णय घेण्यास शेतकऱ्यांना मदत होईल. तसेच भावपातळी कळत असल्याने बाजारात लूट होण्याची शक्यता कमी होते. परिणामी वायदे सुरु केल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे शेतकरी उत्पादक कंपन्यांचे म्हणणे आ

आमची शेतकरी उत्पादक कंपनी २०१७ पासून वायद्यांमध्ये काम करत आहे. बाजार समितीत गेल्यानंतर लिलाव झाल्यावरच शेतकऱ्याला दर माहित होतो. पण एकदा माल बाजारात नेला की परत नेणे परवडत नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही माल त्या दरात विकावा लागतो. परंतु वायद्यांमुळे शेतकऱ्यांना पुढील तीन महिन्यांपर्यंतचा दर कळतो. त्यामुळे माल विकायचा की ठेवावा याचा निर्णय घेता येतो. त्यामुळे सरकारने तातडीने वायदे सुरु करावेत.
ज्ञानेश्वर ढेकळे, परिवर्तन शेतकरी उत्पादक कंपनी, वाशीम
आम्ही मागील तीन वर्षांपासून वायद्यांमध्ये शेतीमाल विकत आहे. वायद्यांमुळे पुढील काही महिन्यांतील दराचा अंदाज येतो. त्यावरून माल विकायचा की ठेवायचा हे ठरवतो. मात्र आता वायदे बंद असल्याने दराचा अंदाज येत नाही. यात शेतकऱ्यांनाच फटका बसतो.
चंद्रशेखर माने, मन्याड रिव्हर अॅग्रो, लातूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com