Kisan Rail : विक्रीसाठी शेतीमाल पुन्हा दिल्ली बाजारपेठेत

रेल्वे प्रशासनाकडून किसान रेल्वे सेवा बंद झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल दिल्ली बाजारपेठेकडे पाठवणे अवघड झाले होते. या संदर्भात पुन्हा किसान रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून केली जात होती.
Kisan Rail
Kisan RailAgrowon

चिखलठाण : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्यावतीने कुर्डुवाडी स्टेशनवरून दिल्लीला शेतमाल (Agriculture Produce) पाठवण्याची सेवा सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या संदर्भातील मागणीला यश आले असून, शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Kisan Rail
Salam Kisan: ९० सेंकंदात माती परीक्षण करणे शक्य होणार

रेल्वे प्रशासनाकडून किसान रेल्वे सेवा (Kisan Rail Service) बंद झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल दिल्ली बाजारपेठेकडे पाठवणे अवघड झाले होते. या संदर्भात पुन्हा किसान रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून केली जात होती. परंतु, ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही.

तथापि, रेल्वे प्रशासनाने हुबळी निजामुद्दीन एक्सप्रेसला पार्सल सेवा सुरू केली असून यामधून शेतकऱ्यांना आपला शेतमाल दिल्ली बाजारपेठेकडे पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील सांगोला माढा, माळशिरस करमाळा तालुक्यातील डाळिंब, केळी, पेरू, सिताफळ व भाजीपाला यासारखी पिके दिल्ली बाजारपेठेकडे सवलतीच्या दरात पाठवली जात होती.

Kisan Rail
‘Kisan rail: 'किसान रेल्वे`ची महाराष्ट्रात घोडदौड

या बाजार पेठेशी लिंक जुळल्याने व दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. दरम्यान गेल्या एप्रिल महिन्यापासून ही सेवा बंद होती. करमाळा तालुक्यातील केंद्र येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष किरण डोके, शेटफळ येथील लोकविकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे विजय लबडे, नानासाहेब साळूंके, महावीर निंबाळकर यांनी कृषीरत्न आनंद कोठडीया यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.

मध्य विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना भेटून निवेदन देऊन ही सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने सध्या दर शनिवारी हुबळी निजामुद्दीन एक्सप्रेसला चोवीस टनी कोचीमध्ये चार डब्बे मिळण्याची व्यवस्था केली असून याचा प्रारंभ कुर्डुवाडी स्थानकावर करण्यात आला.

दिल्ली बाजारपेठेत माल पाठवण्यासाठी सुविधा सुरु केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार. किसान रेल्वे बंद झाल्यापासून या परिसरातील शेतकऱ्यांची होणारी अडचण या सेवेमुळे काही प्रमाणात दुर होणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आनंद कोठडीया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेल्या मागणीला यश आले आहे, तरी किसान रेल्वेची आमची मागणी कायम आहे.
किरण डोके, शेतकरी कंपनी प्रतिनिधी, कंदर, ता. करमाळा
दर शनिवारी : टी क्रमांक २०६५५७ हुबळी निजामुद्दीन (दिल्ली) एक्सप्रेसच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे, सेवेचा लाभ घेण्यासाठी कुर्डुवाडी स्टेशनवरील पार्सल कार्यालय/वस्तू कार्यालयाशी संपर्क साधावा. स्वखर्चाने लोडिंग आवश्यक असल्यास पेमेंटवर मजूरदेखील उपलब्ध आहेत. रस्त्याच्या तुलनेत नाशवंत मालाची वाहतूक करण्यासाठी कुर्डुवाडी ते दिल्ली २६ तासात माल पोहचणार असल्याने शेतकऱ्यांना वाजवी दरात जलद सेवा मिळणार आहे.
लक्ष्मीपुत्र ओत्तूर, रेल्वे अधिकारी, सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com