
Edible Oil Rate : खाद्यतेल बाजारात सध्या नरमाईचे सावट आहे. त्यातच बॅंकिंग क्षेत्रावर संकटाची चाहूल आहे. त्यामुळे सूर्यफुल तेलाचे भाव मागील अडीच वर्षातील निचांकी पातळीवर पोचले आहेत.
तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सूर्यफुल तेलाच्या दरात दोन महिन्यातच १५ टक्क्यांची नरमाई आली.
सूर्यफुल तेलाचे दर सध्या चिंताजनक पातळीवर पोचले. निर्यातीसाठी सूर्यफुल तेलाचे भाव ९८० ते ९९० डाॅलर प्रतिटनावर आहेत. युक्रेनमधील बंदारवर स्पाॅटचे दरही टनामागे १२५ डाॅलरने कमी झाले. सध्या स्पाॅटचे भाव ९०० डाॅलरवर आहेत.
सोयाबीन तेलाचे वायदेही सद्या दबावात आहते. तर युरोपियन युनियनमध्ये मोरही तेलाचे दर कमी झाले. त्याचा दबाव रशिया आणि युक्रेनच्या सूर्यफुल तेलावर येत आहे. चीनमध्ये सध्या खाद्यतेलाचा मोठा साठा आहे. तर युरोपियन खरेदीदारांकडेही पुरेसा पुरवठा सुरु आहे.
तर भारताने सूर्यफुल तेलावरील आयातशुल्क काढलेले आहे. याचा दबाव सूर्यफुल तेलाच्या दरावर येत आहे. पण हा दबाव कमी कालावधीसाठी असेल, असे सूर्यफुल तेल निर्यातदारांनी सांगितलं.
रमजानच्या महिन्यात खाद्यतेलाला चांगला उठाव असतो. यंदा २२ मार्च ते २१ एप्रिलच्या दरम्यान रमजान आहे. पण यंदा सूर्यफुल तेलाला कमी उठाव मिळतोय. पण सूर्यफुल तेलाचे दर दीर्घकाळात दबावात राहणार नाहीत. दीर्घकाळात भाव वाढण्यासाठी पोषक घटक आहेत.
सूर्यफुल तेलाला चीन आणि भारत या महत्वाच्या ग्राहक बाजारांकडून मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तर अर्जेंटीनात दुष्काळामुळे सोयातेलाचे उत्पादनही कमी राहील.
पामतेल बाजारातही घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सूर्यफुल तेलाचे दर सुधारू शकतात, असा अंदाजही निर्यातदारांनी व्यक्त केला.
युक्रेनमध्ये यंदा सूर्यफुल तेल उत्पादन घटले. त्यामुळे युक्रेनमधून सूर्यफुल तेलाचा पुरवठा कमी होणार आहे. याचाही फायदा सूर्यफुल बाजाराला होऊ शकतो, असाही अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.