Sugar Export : कारखान्यांकडून ३६ लाख टन साखर निर्यातीसाठी रवाना

जागतिक बाजारात सध्या साखरेचे दर तेजीत आहेत. यंदा युरोपमध्ये साखर उत्पाद कमी राहण्याचा अंदाज आहे.
Sugar Export
Sugar ExportAgrowon

पुणेः भारत सरकारने यंदा केवळ ६० लाख टन साखर निर्यातीचा (Export of sugar) कोटा जाहीर केला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर (International Market Sugar Rate) तेजीत आहेत. भारतीय साखरेलाही मागणी वाढली आहे.

त्यामुळे देशातील साखर कारखान्यांनी जवळपास ३६ लाख टन साखर निर्यातीसाठी पाठवली आहे, अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने दिली.

जागतिक बाजारात सध्या साखरेचे दर (Sugar Rate) तेजीत आहेत. यंदा युरोपमध्ये साखर उत्पाद कमी राहण्याचा अंदाज आहे. यंदा भारतात साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे देशातून साखर निर्यातही कमी राहील, असा अंदाज निर्यातदार व्यक्त करत आहेत.

यंदा केंद्र सरकारने केवळ ६० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर दरावर झाला. ब्राझीलची साखर अद्याप बाजारात आली नाही. त्यामुळे साखरेच्या दराला आणखी आधार मिळाला. तसंच भारतीय साखरेला मागणीही मजबूत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात दर तेजीत आहेत आणि मागणीही चांगली असल्याने देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी गतीने हालचाली सुरु केल्या आहेत.

Sugar Export
Sugar Export : साखर निर्यात कोटावाढीबाबत केंद्र जानेवारीत घेणार आढावा

देशातील  साखर कारखान्यांनी ३५ लाख ८३ हजार टन साखर निर्याताठी बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्रातील रिफायनरिंकडे पाठवली आहे, अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशन दिली. म्हणजेच सरकारने परवानगी दिलेल्या एकूण कोट्याच्या निम्यापेक्षा अधिक साखर निर्यातीच्या प्रक्रियेत आहे.

शुगर ट्रेडर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठविलेल्या एकूण ३५ लाख ८३ हजार टन साखरेपैकी २७ लाख ८३ हजार टन साखर प्रत्यक्ष निर्यात झाली.

तर ३ लाख ७० हजार टन साखर एसईझेड मधील रिफायनरिंना देण्यात आली. तसेच ४ लाख २४ हजार टन साखर निर्यातासाठी जहाजांमध्ये चढविण्याचे काम सुरु आहे. 

बांगलादेश सर्वात मोठा खरेदीदार

ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रफूल विठलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडून बांगलादेश आणि इंडोनेशियाने सर्वाधिक साखर खेरदी केली. बांगलादेशने २ लाख ७० हजार टन भारतीय साखर आयात केली.

इतर देशांना निर्यात

इंडोनेशियाने २ लाख ६१ हजार टन साखरेची खरेदी केली. जिबुतीने २ लाख ४७ हजार टन, सोमालिया २ लाख ४६ हजार टन, युएई २ लाख ६ हजार टन, सुदान १ लाख ६६ हजार टन, सौदी अरेबिया १ लाख ६५ हजार टन आणि मलेशिया, श्रीलंका आणि चीनने १ लाख १२ हजार टन साखर भारताकडून आयात केली.

तसेच इराण, अफगाणिस्तान आणि कॅमेरून देशानेही भारताकडून साखर आयात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com