ॲक्टिव्हेटेड कार्बनमुळे नारळ व उत्पादनाच्या निर्यातीत ४१ टक्क्यांची वाढ

ॲक्टिव्हेटेड कार्बनच्या (चारकोल) निर्यात करारामुळे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात नारळ आणि उत्पादनांची निर्यात ४१ टक्क्यांनी वाढली. निर्यातीतून देशाला ३२३७ कोटी रुपयांची कमाई झाली.
ॲक्टिव्हेटेड कार्बनमुळे नारळ व उत्पादनाच्या निर्यातीत ४१ टक्क्यांची वाढ
Activated CarbonAgrowon

नारळ आणि नारळाच्या इतर उत्पादनांच्या निर्यातीतून परकीय चलन मिळवणारा भारत आता ॲक्टिव्हेटेड कार्बनच्या (Activated Carbon) निर्यातीतूनही कमाई करायला लागला आहे. सोने वितळवणे आणि शुद्धीकरणासाठी आवश्यक ॲक्टिव्हेटेड कार्बन निर्यातीमुळे २०२२ साली भारताच्या नारळ व उत्पादनांच्या निर्यातीत भरीव वाढ झाली आहे.

नारळ आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीमधून २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भारताने २२९५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यातुलनेत ॲक्टिव्हेटेड कार्बनच्या (चारकोल) निर्यात करारामुळे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात नारळ आणि उत्पादनांची निर्यात ४१ टक्क्यांनी वाढली. निर्यातीतून देशाला ३२३७ कोटी रुपयांची कमाई झाली.

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षात देशाला केवळ ॲक्टिव्हेटेड कार्बनच्या निर्यातीतून २०६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. भारताने १ लाख ३७ हजार ३६३ टन ॲक्टिव्हेटेड चारकोल निर्यात केला.

ॲक्टिव्हेटेड कार्बनच्या निर्यातीत अमेरीका सातत्याने आघाडीवर राहिला आहे. सोने वितळवणे अथवा शुद्धीकरणासाठी ॲक्टिव्हेटेड कार्बनचा वापर केला जातो. अमेरिकेप्रमाणेच जर्मनी, रशिया, कोरिया, नेदरलँड, बेल्जीयम, कॅनडा या देशांकडूनही ॲक्टिव्हेटेड कार्बनची निर्यात केली जाते.

Activated Carbon
चीनकडून भारतीय नारळ तेलाच्या खरेदीची शक्यता

सोन्याच्या किमतीत होणारी सततची वाढ, अधिकच्या व्यवसायासाठी सोन्याच्या खाणींचा घेतला जाणारा शोध या पार्श्वभूमीवर जगभरात ॲक्टिव्हेटेड कार्बनची मागणी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात ॲक्टिव्हेटेड कार्बनचा व्यापार वाढणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. जगातील इतर ॲक्टिव्हेटेड कार्बन उत्पादक देशांप्रमाणेच भारतातील ॲक्टिव्हेटेड कार्बनलाही चांगली मागणी आहे.

कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स महासंचलनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात नारळ तेल व तत्सम उत्पादनाच्या १६,०३६ टन निर्यातीतून ४३० कोटी रुपयांची कमाई झाली. ११,३२५ टन खोबऱ्याच्या निर्यातीच्या माध्यमातून १३९ कोटींचा महसूल मिळाला. नारळाच्या पावडर निर्यातीतून ११९ कोटी रुपये मिळालेत. याखेरीज २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात नारळ आणि उत्पादनांची ७२८ कोटी रुपयांची आयात करण्यात आली. नारळाच्या करवंटीपासूनच्या कार्बनची आयात करण्यात आली.

कसा तयार होतो ॲक्टिव्हेटेड कार्बन?

कोळसा, नारळाची करवंटी आणि लाकडापासून ॲक्टिव्हेटेड कार्बन बनवतात. कार्बनचे भरपूर प्रमाण असलेले हे घटक ऑक्सिजनशिवाय ६०० ते ९०० अंश सेल्सिअस तापमानाला तापवले जातात. यानंतर हा कार्बन अरगॉन आणि नायट्रोजनसह रसायनांच्या संपर्कात येतो.त्यानंतरही त्याला पुन्हा तेवढ्याच प्रमाणात तापवले जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com