शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाही

पुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची निर्यात आधीपासूनच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारत-चीन व्यापारी कोंडीचा परिणाम राज्यातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर होणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची निर्यात आधीपासूनच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारत-चीन व्यापारी कोंडीचा परिणाम राज्यातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर होणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाच्या निर्यात कक्षाचे सल्लागार डॉ.गोविंद हांडे म्हणाले, की २०१७ मध्ये राज्यातून अवघा ७० कोटी रुपयांचा शेतीमाल चीनला पाठविला गेला. त्यानंतर २०१८ मध्ये निर्यात ४० टक्क्यांनी वाढून १०६ कोटींपर्यंत गेली. मात्र, गेल्या वर्षी निर्यात पुन्हा घसरून ५९ कोटींवर आली. सध्याची ही निर्यात अत्यल्प आहे. त्यामुळे चालू स्थितीत चीनने काही बंधने टाकली तरी राज्याच्या शेतमाल निर्यातीवर परिणाम होणार नाही.

भारतीय भुईमूग, गवारगम, कडधान्ये, फळांचा रस, आंब्याचा पल्प असा निवडक शेतमाल चीनला निर्यात होतो. राज्यातून साखर, द्राक्षे, आंबा तसेच इतर फळांची निर्यात चीनला होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तथापि, युरोपप्रमाणे चीनच्या बाजारपेठेत महाराष्ट्रातील निर्यातदारांचा जम बसलेला नाही.“चीनला देशाच्या निर्यातीपैकी वरील वस्तूंचे निर्यातमुल्य पाहिल्यास ती ०.०८ टक्के इतकी नगण्य आहे. 

महाराष्ट्रातून जगभर गेलेल्या झालेल्या एकूण निर्यातीपैकी फक्त ०.२७ टक्के मूल्याचा माल गेल्या वर्षी गेला आहे. त्यामुळे राज्याच्या शेतीमालातील निर्यातीला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याची शक्यता वाटत नाही,” असे डॉ. गोविंद हांडे यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया  भारतीय शेतीमाल मोठ्या प्रमाणात चीनला जात नाही. मात्र, काही उत्पादनांसाठी चीन ही नवी व महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयाला येत आहे. तेथे अलीकडेच ४००-५०० कंटेनर द्राक्षे जात होती. द्राक्षांसाठी हीच बाजारपेठ पुढे वाढणार आहे. सध्या द्राक्षे, कापूस, धागे, सोयाबीन पेंडची निर्यात चीनला केली जाते. त्यामुळे भारत-चीनमध्ये व्यापारी युद्ध वाढले तर या निवडक कृषिमालाच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनी.  

 भारतातून चीनला झालेली निर्यात
वर्ष  शेतमाल टन एकूण मूल्य(कोटीत)
२०१७-१८ ५५८०८ ४६४ 
२०१८-१९  १०४२९० ९२३
२०१९-२०   ९८५१४ ८४२ 
 महाराष्ट्रातून चीनला झालेली निर्यात
वर्ष  शेतमाल टनात एकूण मूल्य (कोटीत)
२०१७-१८ ९७९९ ७०
२०१८-१९   १५४७६ १०६
२०१९-२०   ६७५९  ५९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com