ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा गौरव

पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स ली.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा गौरव
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा गौरव

जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशनतर्फे ‘ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड’ येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स ली.चे उपाध्यक्ष अनिल जैन यांना नुकताच प्रदान करण्यात आला. फाउंडेशनने दोन दिवसांची पाचवी जागतिक जलशिखर परिषद आयोजिली होती. जैन इरिगेशनच्या पर्यावरण व पाण्याच्या संदर्भात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला अधोरेखित करून हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्वीकारला. ऑनलाइन पद्धतीने ही परिषद सुरू झाली. जल व्यवस्थापनातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटचा उपयोग करून समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनांना दि एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट फाउंडेशन (EEF) या संस्थेतर्फे हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. श्री. जैन यांनी ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्ड- २०२१ स्वीकारताना सांगितले, की पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला. हा पुरस्कार जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनी शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टीने केलेल्या कामाला मिळाला आहे. चार दशकांहून अधिक काळ अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जैन उच्च कृषी तंत्रज्ञान फलदायी ठरत आहे. ही त्याचीच पावती आहे. जैन कृषी तंत्रज्ञानामुळे सूक्ष्म सिंचन करता आले आणि  पिकांच्या उत्पादनात भरीव झाली. हा पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना मूल्य वृद्धी करता आली आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले. या परिषदेत ऑस्ट्रेलियाच्या वकिलातीतील उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेला ए. ओ., नेदरलँडचे राजदूत मार्टेन व्हॅन डेन बर्ग, पॉवर फिनान कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. व्ही. के. गर्ग आणि केंद्रीय ऊर्जा विभागाचे माजी सचिव अनिल राजदान ऑनलाइन सहभागी झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com