साखर उत्पादनाची शतकी मजल

देशात यंदाचा साखर हंगाम सुरू झाल्यापासून पहिल्या तिमाहीतच साखर उत्पादनाने शतकी मजल गाठली आहे. ३१ डिसेंबरअखेर देशात ११५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.८१ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे.
साखर उत्पादनाची शतकी मजल
Century of sugar production

कोल्हापूर : देशात यंदाचा साखर हंगाम सुरू झाल्यापासून पहिल्या तिमाहीतच साखर उत्पादनाने शतकी मजल गाठली आहे. ३१ डिसेंबरअखेर देशात ११५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.८१ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे. महाराष्ट्राने डिसेंबरअखेर आपली आघाडी कायम ठेवली असून नजीकचा प्रतिस्पर्धी उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात तब्बल १५ लाख टन साखर जादा उत्पादन झाले आहे. ३१ डिसेंबरअखेर महाराष्ट्रात ४५ लाख टन साखर तयार झाली. उत्तर प्रदेशात ३० लाख टन उत्पादित झाली आहे. 

राज्यात चाळीस टक्के उत्पादन देशाच्या एकूण उत्पादनाच्या जवळजवळ ४० टक्के साखर एकट्या महाराष्ट्रात तयार होत असल्याचे साखर उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्यावर्षी पेक्षा १० कारखाने ज्यादा सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी १७९ साखर कारखाने सुरू होते या कारखान्यांनी या कालावधीत ३९ लाख टन साखरनिर्मिती केली होती. यंदा १८९ कारखाने सुरू झाले आहेत. त्यांच्यामार्फत ४५ लाख टन साखर तयार झाली. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत विविध ठिकाणी झालेल्या पावसाने गळीत हंगामात अडथळे निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर पाऊस थांबल्याने डिसेंबरच्या उत्तरार्धात मात्र साखर हंगामाने चांगलीच गती पकडली. कोल्हापूरसारख्या विभागांमध्ये साखर उताराही वाढल्याने साखरेचे उत्पादन गतीने झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.  यंदाच्या हंगामात नोव्हेंबर २०२१ पर्यंत एकूण साखरेची विक्री सुमारे ४७.५० लाख टन होती. सरकारने या कालावधीपर्यंत ४६.५० लाख टनांचा कोटा दिला होता. सरकारने सप्टेंबरच्या साखर विक्रीचा कालावधी ऑक्टोबर पर्यंत वाढवला होता. आता डिसेंबरचा कालावधीही जानेवारीपर्यंत वाढवला आहे. यामुळे एका महिन्याच्या कोट्याची साखर दोन महिन्यापर्यंत विकता येणार आहे. अन्य राज्यांतील  साखर उत्पादन असे  (लाख टन)     कर्नाटक      २५      तमिळनाडू      ०.९२     बिहार      १.९४     हरियाना      १.७४     उत्तराखंड      १.२३  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.