चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी 

जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची चीनने मोठी खरेदी केली आहे. भात, गहू, सोयाबीन, मका आणि कापसाचा मोठा साठा चीनने केला आहे.
soybean
soybean

पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची चीनने मोठी खरेदी केली आहे. भात, गहू, सोयाबीन, मका आणि कापसाचा मोठा साठा चीनने केला आहे. जागतिक पातळीवर गव्हाच्या एकूण ३१८.२० दशलक्ष टन साठ्यापैकी तब्बल १९७.०३ टन साठा चीनमध्ये आहे. तर भाताच्या जागतिक १७७.८३ दशलक्ष टन साठ्यापैकी ११६.४० दशलक्ष टन साठा एकट्या चीनमध्ये आहे, अशी माहिती अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली. जगातील एकूण शेतमालाच्या साठ्यात चीनचा वाटा मोठा असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात चीनला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

जगात गव्हाचा पुरवठा फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात ३५ लाख टनांनी वाढून १०७७.१ दशलक्ष टन झाला आहे. ऑस्ट्रेलियात गव्हाचे उत्पादन वाढल्याने जागतिक उत्पादन ७७६.८ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. ऑस्ट्रेलियात गव्हाचे उत्पादन विक्रमी ३३ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये मानवी वापर आणि पशुखाद्यासाठी मागणी वाढल्याने गव्हाचा वापरही वाढला आहे. जागतिक गव्हाचा वापर ६६ लाख टनांनी वाढून ७७५.९ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे.  देशनिहाय गहू निर्यात (दशलक्ष टन)  अर्जेंटिना ः ११.५०  ऑस्ट्रेलिया ः २२  कॅनडा ः २७  देशनिहाय गहू आयात (दशलक्ष टन)  बांगलादेश ः ६.६०  ब्राझील ः ६.७०  चीन ः १०.५० 

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियात भात उत्पादनात घट होऊनही भारतात मोठी वाढ झाल्याने जागतिक भात उत्पादनातही वाढ झाली आहे. भारतात यंदा उत्पादकता विक्रमी राहिल्याने उत्पादनही १२१ दशलक्ष टनांवर विक्रमी राहिल्याचे अहवालात म्हटले आहे.  देशनिहाय भात निर्यात (दशलक्ष टनांत)  बर्मा ः २.४०  भारत ः १५.५०  पाकिस्तान ः ४.१०  देशनिहाय भात आयात (दशलक्ष टनांत)  चीन ः ३  युरोपियन देश ः २.४०  इंडोनेशिया ः ०.५० 

जागतिक पातळीवर भरडधान्याचे उत्पादन ५९ लाख टनांनी वाढले आहेत. त्यामुळे जागतिक उत्पादन १४४४.८ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जागतिक भरडधान्य उत्पादन आणि व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच शिल्लक साठाही जास्त राहण्याची शक्यता आहे.  देशनिहाय भरडधान्य निर्यात (दशलक्ष टन)  अर्जेंटिना ः ३७.८१  ऑस्ट्रेलिया ः ६.९५  ब्राझील ः ३९.०३  देशनिहाय भरडधान्य आयात (दशलक्ष टनांत)  युरोपियन देश ः १५.७६  जपान ः १७.२२  मेक्सिको ः १६.८८ 

भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशात उत्पादन वाढल्याने जागतिक पातळीवरही मका उत्पादनात वाढ झाली आहे. तर मेक्सिकोत मका उत्पादनात घट झाली आहे. भारतात मका पेरणी आणि उत्पादकता वाढल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तर दक्षिण आफ्रिकेत पोषक वातावरण असल्याने उत्पादनात वाढ झाली.  देशनिहाय मका निर्यात (दशलक्ष टन)  अर्जेंटिना ः ३४  ब्राझील ः ३९  रशिया ः ३.१०  देशनिहाय मका आयात (दशलक्ष टन)  इजिप्त ः १०.३०  युरोपियन देश ः १५.३०  जपान ः १५.६० 

कापूस उत्पादनात घट  जागतिक पातळीवर कापसाचे कमी उत्पादन आणि शिल्लक साठ्यातही घट येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र यंदा कापसाचा वापर आणि व्यापार वाढणार असल्याचे म्हटले आहे. ब्राझील आणि अमेरिकेत उत्पादनात घट मोठी घट झाल्याने जागतिक कापूस उत्पादन ८ लाख ३० हजार गाठींनी कमी होण्याची शक्यता आहे. टर्की, बांगलादेश, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या देशांमध्ये कापसाचा वापर वाढण्याची शक्यता आहे. तर तैवान आणि अमेरिकेत कापूस वापर घटण्याची शक्यता आहे.  देशनिहाय कापूस निर्यात (दशलक्ष गाठी)  मध्य आशिया ः १.६३  आफ्रिका ः ४.७७  दक्षिण गोलार्ध ः १२.५७  देशनिहाय कापूस आयात (दशलक्ष गाठी)  मेक्सिको ः ०.८०  चीन ः ११  युरोपियन देश ः ०.६१  चीनकडून सोयाबीनची मोठी आयात  जागतिक पातळीवर सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादन १० लाख टनांनी वाढून १३४ दशलक्ष टन राहणार आहे. भारतातही सोयाबीन उत्पादन २ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  देशनिहाय सोयाबीन निर्यात (दशलक्ष टन)  अर्जेंटिना ः ७  ब्राझील ः ८५  पेरुग्वे ः ६.५०  देशनिहाय सोयाबीन आयात (दशलक्ष टनांत)  चीन ः १००  युरोपियन देश ः १५.१५  आग्नेय आशिया ः ९.६३  जगाच्या तुलनेत चीनमधील साठा (टक्क्यांत)  ६८ टक्के  मका  ५० टक्के  गहू  ६२ टक्के  भरडधान्य  ६५ टक्के  भात  ३९ टक्के  कापूस  ३५ टक्के  सोयाबीन  मालाचा जगाच्या तुलनेत चीनमध्ये साठा (दशलक्ष टनांत) (कापूस दशलक्ष गाठींत)  जगात/चीन  २८७.६७/१९६.१८  मका  ३०१.१९/१५०.४३  गहू  ३१८.२०/१९७.०३  भरडधान्य  १७७.८३/११६.४०  भात  ९४.५९/३७.२७  कापूस  ८३.७४/२९.६०  सोयाबीन 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com