जगभरात कापसाचे दर चढेच राहतील
जगभरात कापसाचे दर चढेच राहतील

जगभरात कापसाचे दर चढेच राहतील

कापसाचा जागतिक दर आधिच्या १०४ सेंट्सच्या तुलनेत २ सेंट्सनी वाढून १०६ सेंट्सवर पोहोचण्याची शक्यता आहे, असे इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायजरी कमिटीने अहवालात म्हटले आहे.

पुणे : जागतिक कापूस वापरात होणारी वाढ, कमी शिल्लक साठा आणि तसेच अनेक देशांत उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने २०२१-२२ च्या हंगामात कापसाचे दर वाढतील. कापसाचा जागतिक दर आधिच्या १०४ सेंट्सच्या तुलनेत २ सेंट्सनी वाढून १०६ सेंट्सवर पोहोचण्याची शक्यता आहे, असे इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायजरी कमिटीने अहवालात म्हटले आहे.  कमिटीने जगातील महत्वाच्या देशांत कापूस वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच कापसाचे आंतरराष्ट्रीय दराचा अंदाज जाहिर केला. जागतिक कापूस वापर यंदा वाढण्याची शक्यता कमिटीने व्यक्त केली आहे. भारत, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांत मागणी वाढल्याने जागितक कापूस वापर यंदा २६० लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त कली आहे. मागील वर्षी जागतिक वापर २५६ लाख टन होता. कापूस वापर वाढल्याने यंदा जागतिक कापूस दर २ सेंट्सने वाढून १०६ सेंट्स प्रतिपौंड राहील, असे म्हटले आहे.  कोरोनाच्या काळात कापसाला चांगली मागणी राहिल्याने यंदा कापसाचा शिल्लक साठा कमी आहे. इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायजरी कमिटीच्या मते यंदा कापसाचा जागतिक शिल्लक साठा १९९ लाख टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात २०२ लाख टन शिल्लक साठा होता. कमी पुरवठा आणि वाढलेल्या वापरामुळे गेल्या हंगामातील कापूस मोठ्या प्रमाणात बाहेर आला. त्यामुळे यंदाच्या हंगामात शिल्लक साठा कमी आहे.  निर्यातीत घट होणार जागतिक कापूस वापर वाढत असला तरी निर्यातीत मात्र घट होण्याचा अंदाज आहे. कमिटीने यंदा जागतिक निर्यात १०५ लाख टन राहील, असे अहवालात म्हटले आहे. गेल्या हंगामात १०७ लाख टन कापूस निर्यात झाली होती. कापूस उत्पादक महत्त्वाच्या देशांत सध्या आंतरराष्ट्रीय कापूस दरापेक्षा अधिक दर आहेत. त्यामुळे या देशांतून निर्यात कमी होण्याची शक्यता आहे.  भारतात कापूस उत्पादन घटीचा अंदाज इंटरनॅशनल कॉटन अॅडव्हायजरी कमिटीने यंदा जागतिक कापूस उत्पादन २५७ लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या हंगामात जागतिक पातळीवर २४३ लाख टन कापूस उत्पादन झाले होते. अमेरिकेत उत्पादनात वाढ झाल्याने जागितक उत्पादनाचा आकडा वाढलेला दिसत आहे. यंदा अमेरिकेत कापूस उत्पादन ३९ लाख टन राहण्याची शक्यता असून, गेल्या हंगामात येथे ३२ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा ७ लाख टनांनी कापूस उत्पादन वाढीचा अंदाज कमिटीने व्यक्त केला. भारताचा विचार करता यंदा उत्पादनात १ लाख टनाने घटीची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या हंगामात भारतात ६० लाख टन कापूस उत्पादन झाले हेते, ते यंदा ५९ लाख टनांवर राहण्याचा अंदाज आहे, असे कमिटीने अहवालात नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com