Last summer stocks in Nashik
Last summer stocks in Nashik

नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडे

फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची जिल्ह्यात आवक सुरू झाली होती. लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक डिसेंबरमहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंद झाली आहे.

नाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची जिल्ह्यात आवक सुरू झाली होती. लासलगाव, पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बंद झाली आहे. कसमादे भागातील काही बाजार आवारात किरकोळ आवक आहे. उन्हाळ  कांद्याच्या साठा अखेरीकडे आला आहे; मात्र अपेक्षित दर न मिळाल्याने हंगाम निराशादायी ठरल्याचे शेतकाऱ्यांचे मत आहे. कसमादे पट्ट्यात प्रामुख्याने सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यांच्या काही भागांत मार्च महिन्यात कांदा काढणीपूर्व झालेल्या गारपीट व  अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान झाले होते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कांदा डिसेंबरपर्यंत साठवून  टप्प्याटप्प्याने विक्री केल्याचे पाहायला मिळाले. मात्र उत्पन्न वाढ साधलेली नाही. ऑगस्टपासूनच वातावरणीय बदलांमुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर सड होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुढे आवक कमी कमी होत जाऊन ऑक्टोबरनंतर बाजार समित्यांमध्ये दरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. वाढती मागणी व पुरवठा कमी झाल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. मात्र डिसेंबरच्या मध्यानंतर कांद्याचा साठा जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. कमसादे भागात किरकोळ आवक सुरू आहे. प्रतिक्रिया कंटनेर भाडे दुप्पट झाल्याने निर्यात खर्च वाढला, त्यामुळे  अपेक्षित निर्यात होऊ शकलेली नाही. त्यात कंटेनरची कमी उपलब्धता, इंधन दरवाढ अडचणीची ठरली. त्यातच निर्यात धोरण स्थिर नसल्याने मागणीचा फटका बसतो आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत राहिले. शेतकरी व व्यापारी हंगाम अडचणींचा ठरला आहे. त्यामुळे निर्यात वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह २०२२पासून कांदा निर्यात धोरण स्थिर असावे.  -मनोज जैन, कांदा व्यापारी व निर्यातदार, लासलगाव, जि. नाशिक

प्रतिकूल परिस्थितीत उन्हाळ कांदा साठवण्याची मेहनत घेऊनही अपेक्षित भाव मिळाला नाही. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान मोठ्या प्रमाणावर सड झाली. त्यामुळे पुरवठा कमी झाल्यानंतर भाव वाढले; मात्र कांदा शिल्लक असताना काहीच लाभ झाला नाही, पदरी निराशा आहे.  -मधुकर मोरे, कांदा उत्पादकस ठेंगोडा, ता. सटाणा

असा राहिला उन्हाळ कांदा हंगाम    मार्च महिन्यातील अवकाळी व गारपिटीमुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर सड   हंगामाच्या सुरुवातीला उठाव नसल्याने दराचा फटका   कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल व मे महिन्यात कांद्याची बाजारपेठ विस्कळीत   देशावर व निर्यातीत मागणी असूनही पुरवठ्यात अडचणी   अस्थिर निर्यात धोरणामुळे मागणीवर परिणाम काही भागात कांदा दीर्घकाळ टिकला; वजनात घट   माल संपुष्टात आल्याने ऑक्टोबरनंतर उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा   कांदा लिलावात किमान व कमाल दरात मोठी तफावत; सरासरी दराचा लाभ कमीच

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com