खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणार

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या सोयाबीन आणि भुईमूग उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता असून, तेलबिया उत्पादन २३३.९० लाख टन होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
Oilseed production will decline during the kharif
Oilseed production will decline during the kharif

पुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या सोयाबीन आणि भुईमूग उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता असून, तेलबिया उत्पादन २३३.९० लाख टन होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. यंदा खरिपात केंद्र सरकारने तेलबिया उत्पादनाचे २६० लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते, तर गेल्या हंगामात २४०.३० लाख टन तेलबिया उत्पादन झाले होते.

खरिपात सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल आणि एरंड आदी तेलबिया पिकांचे उत्पादन होते. मात्र यात सर्वाधिक वाटा हा सूर्यफुलाचा असतो. २०१९-२० मध्ये तेलबिया उत्पादन २२२.४७ लाख टन, २०१८-१९ मध्ये २०६.७६ लाख टन आणि २०१७-१८ मध्ये २१०.०६ लाख टन झाले होते. कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन १२७.२० लाख टन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे १२८.९७ लाख टन उत्पादन झाले होते.

या वेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, की खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये अन्नधान्याचे विक्रमी १५०.५० दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकरी हिताची धोरणे, शेतकऱ्यांचे कष्ट आणि कृषी शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांतून विक्रमी उत्पादन होणार आहे.  

खरीप हंगामातील उत्पादनाचे अंदाज (लाख टनांत)
पीक २०२१-२२ २०२०-२१ बदल (टक्के)
अन्नधान्य १५०.५० १४९.५६ ०.६३
भात १०७.०४ १०४.४१ २.५२
भरडधान्य ३४ ३६.४६ (-६.७५)
मका २१.२४ २१.४४ (-०.९३)
कडधान्य ९.४५ ८.६९ ८.७५
तूर ४.४३ ४.२८ ३.५
तेलबिया २३.३९ २४.०३ (-२.६६)
भुईमूग ८.२५ ८.५५ (-३.५१)
सोयाबीन १२.२७ १२.८९ (-१.३२)
कापूस* ३६.२२ ३५.३८ २.३७
(*कापूस लाख गाठींत- एक गाठ = १७० किलो)
  1. तेलबिया उत्पादन २३३.९० लाख टन होण्याचा अंदाज
  2. देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन १२७.२० लाख टन होण्याची शक्यता
  3. अन्नधान्याचे विक्रमी १५०.५० दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com